घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठ फुलली; ग्राहकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

नाशिक रोडला प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिराला फक्त रंगरंगोटी करण्यात आली. दर वर्षी मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात येते. परिसरातील विविध भागात रस्त्याच्या दुभाजकात आकर्षक रोषणाई करण्यात येते. या वर्षी या सर्व गोष्टींना फाटा देण्यात आला आहे.

नाशिक : (नाशिक रोड) कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सवाला बंदी असली तरी घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेसाठी पूजेचे साहित्य विक्रीसाठी नाशिक रोड, जेल रोड, देवळालीगाव, विहितगाव मुख्य बाजार पेठ व चौकात गर्दी झाली. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पूजेचे साहित्यविक्रीची दुकाने थाटली आहेत. 

पूजा साहित्याने सजली दुकाने

नवरात्रोत्सवाला शनिवार (ता. १७)पासून प्रारंभ होत आहे. या वर्षी सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आहे. तसेच मंदिरेही भाविकांसाठी बंद आहेत. परंतु मंदिरात पारंपरिक पूजा व सकाळ-सायंकाळ आरती केली जाईल. त्यासाठी कोणालाही आमंत्रित न करता स्थानिक पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा होईल. यानिमित्त परिसरातील, नाशिक रोड, जेल रोड, देवळालीगाव, विहितगाव, गांधीनगर आदी ठिकाणी मंदिरात संस्थांतर्फे तयारी झाली आहे. नाशिक रोडला प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिराला फक्त रंगरंगोटी करण्यात आली. दर वर्षी मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात येते. परिसरातील विविध भागात रस्त्याच्या दुभाजकात आकर्षक रोषणाई करण्यात येते. या वर्षी या सर्व गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. तसेच दांडिया, गरबा खेळण्यावरही बंदी आहे. 

हेही वाचा >"कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

नवरात्रोत्सव व्यक्तिगत साजरा करा - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी म्हणाले, की कोरोना संसर्गामुळे नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना या वर्षी गडावर येण्यास मनाई आहे. कावडीधारक निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे आणि गावी, घरी जाऊन देवकार्य करावे. गडावरील स्थानिक नागरिकांना पास दिले जाणार आहे; मात्र पासचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. स्थानिक तहसीलदार आणि पोलिसप्रमुख यांना घटनाप्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे. भाविकांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. यंदाचा नवरात्रोत्सव आपण जर सार्वजनिक स्वरूपात न ठेवता व्यक्तिगत स्वरूपात ठेवला तर त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास नक्कीच मदत होईल, असेही आवाहन केले.  

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Navratri shopping Crowd on Nashik Road nashik marathi news