लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरी चुल पेटण्याचीही भ्रांत.. राष्ट्रवादीच्या "या" आमदारांनी घेतला पुढाकार...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 एप्रिल 2020

संचारबंदीमुळे झालेल्या बॅरिकेडींगमुळे बंद झालेले रस्ते, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी, नागरिकांनी केलेल्या रेशनची दुकाने बंद असल्याच्या तक्रारी या आमदार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या. अनेकांनी याबाबद दूरध्वनी करुन मदत मागीतली होती. अनेकांच्या घरी चुल पेटण्याचीही भ्रांत होती. 

नाशिक :  संचारबंदीमुळे झालेल्या बॅरिकेडींगमुळे बंद झालेले रस्ते, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी, नागरिकांनी केलेल्या रेशनची दुकाने बंद असल्याच्या तक्रारी या आमदार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या. अनेकांनी याबाबद दूरध्वनी करुन मदत मागीतली होती. अनेकांच्या घरी चुल पेटण्याचीही भ्रांत होती. 

सर्वाधीक झळ ग्रामीण भागात

नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्याची सर्वाधीक झळ ग्रामीण भागात शेतमजूर तसेच रोजंदारी करणाऱ्या मजुरांना बसली. लॉकडाऊन होऊन आठ ते दहा दिवस झाल्याने त्यांना भाजीपाला, अन्नधान्य तसेच जीवनाश्‍यक वस्तूंसाठी त्यांना खरेदी करण्याचीही क्षमता राहिली नाही अन्‌ ठरवले तरी दुकाने बंद असल्याने खरेदीही करता येत नाही अशी स्थिती आहे. नाशिक शहरालगतच्या या गावांतील नागीरकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू वाटपासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघतील विविध भागात जाऊन पुढाकार घेतला. परिसरातील नागीरकांनी यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. विविध परिचीतांनी त्यांना धान्य जमा करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे सहा दिवसांत त्यांनी विविध बागातील नागरीकांप्रयंत मदत पोहोचवली.

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

जीवनाश्‍यक वस्तूंचे वाटप
या कालावधीत त्यामुळे देवळाली मतदारसंघातील विविध भागात जाऊन या गरजू नागरीकांना घरपोच गहू, तांदूळ तसेच अन्य जीवनाश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, विक्रम कोठुळे, सोमनाथ बोराडे, संतोष अहिरे, श्रीकांत मगर, विकास पाटील, शुभम कर्डीले, समाधान पवार, गणेश शिरसाठ, शशी थेटे आदी त्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP,s mla saroj shinde distributes essentials to village people in lockdown nashik marathi news