महत्वाची बातमी! एनडीए, नौसेना प्रशिक्षणार्थींसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय; असे आहे वेळापत्रक

अंबादास शिंदे
Saturday, 5 September 2020

शुक्रवार (ता.४) सायंकाळी सहापासून विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्या. १२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ‘कोविड-१९’ अंतर्गत अटी-शर्तींचे नियम पाळूनच प्रवास होणार आहे. प्रशिक्षणार्थींना आरक्षित तिकीट आरक्षण खिडकीवर किंवा ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.

नाशिक : (नाशिक रोड) राष्ट्रीय रक्षा अकादमी (NDA) आणि नौसेना अकादमी (NA) च्या परीक्षार्थींच्या मुंबई आणि नागपूरला परीक्षा होणार आहेत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतून विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. वाचा सविस्तर बातमी

पाचही जिल्ह्यांतून मुंबई-नागपूरसाठी १२ फेऱ्या 

शुक्रवार (ता.४) सायंकाळी सहापासून विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्या. १२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ‘कोविड-१९’ अंतर्गत अटी-शर्तींचे नियम पाळूनच प्रवास होणार आहे. प्रशिक्षणार्थींना आरक्षित तिकीट आरक्षण खिडकीवर किंवा ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. शुक्रवारपासून सायंकाळी सहाला सुरू होणार आहे. मेमू गाडी अनारक्षित राहील. परीक्षार्थींना अनारक्षित तिकीट काढून प्रवास करावा लागेल. सोबत आपले हॉल तिकीट ठेवावे लागेल. 

मुंबईसाठी रेल्वे 

नाशिकहून (गाडी क्र.- ०११३४ ) मुंबईला जाण्यासाठी नाशिकहून शनिवारी (ता. ५) रात्री पावणेबाराला गाडी सुटून मुंबईला पहाटे चारला पोचेल. भुसावळ स्थानकातून (गाडी- ०२१५६) भुसावळ-मुंबई विशेष गाडी शनिवारी भुसावळ स्थानकातून रात्री सव्वानऊला सुटून रविवारी (ता. ६) पहाटे सव्वापाचला मुंबईत पोचेल. यादरम्यान जळगाव- २१.३८ , मनमाड- २३.३८, नाशिक रोड- ००.३५ पोचेल. याशिवाय नगर स्थानकातून (गाडी- ०११३२) नगर- मुंबई विशेष गाडी शनिवारी नगरहून रात्री नऊला सुटून रविवारी (ता. ६) मुंबईला पोचेल. यादरम्यान मनमाड- २५ नाशिक रोड- १.२५ थांबेल. नाशिकहून शुक्रवारी गाडी पनवेल- नागपूर विशेष गाडी (गाडी क्र- ०२१६९) पनवेल-नागपूर विशेष गाडी शनिवारी पनवेलहून दुपारी पावणेदोनला सुटेल. ही गाडी नाशिक रोड स्थानकावर-१७.२०, मनमाड-१८.२५, भुसावळ-२०.४०, अकोला- २२.५५ बडनेरा-००.१० ला थांबेल. 

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

नागपूरसाठी रेल्वे 

जळगाव- नागपूर मेमू गाडी (गाडी- ०२१६३) जळगाव- नागपूर विशेष गाडी शनिवारी जळगाव स्थानकावरून रात्री साडेनऊला निघून रविवारी नागपूरला पोचेल. भुसावळ- २२.१०, अकोला-००.३०, बडनेरा-०१.४५ थांबेल, गाडी क्र- ०२१६६, तर नगर-नागपूर विशेष गाडी (गाडी- ०२१६७), नगर- नागपूरदरम्यान शनिवारी नगर स्थानकाहून दुपारी चारला निघून नागपुरला दुसऱ्या दिवशी पहाटे चारला पोचेल. मनमाड-१९.००, भुसावळ-२१.४५, अकोला-२३.५० बडनेरा-०१.१५. (गडी क्र-०२१६८).  

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA, Special Railway for Naval Trainees nashik marathi news