मालेगाव मनपा स्थायी समितीत नवीन चेहरे; जाधव, अहिरे सभापतिपदी शक्य

प्रमोद सावंत
Thursday, 15 October 2020

विशेष महासभेत स्थायी समिती सदस्यांबरोबरच महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. शिवसेनेतर्फे गटनेते राजाराम जाधव, नगरसेविका आशा अहिरे व कविता बच्छाव यांना संधी मिळाल्याने श्री. जाधव व श्रीमती अहिरे यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत आहे. 

नाशिक : (मालेगाव) महापालिका स्थायी समितीत सर्व नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. बुधवारी (ता. १४) झालेल्या महापालिकेच्या ऑनलाइन विशेष महासभेत समितीतील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन आठ व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर सात अशा एकूण १५ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. 

राजाराम जाधव, आशा अहिरे सभापतिपदी शक्य 

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा झाली. सभेत महागठबंधन आघाडीतर्फे राजीमाना दिलेल्या सदस्यांच्या जागेवर आघाडीतर्फे एमआयएमच्या सदस्याचे नाव आल्याने गोंधळ झाला. महापौरांनी त्यास असंमती दर्शविली. ज्या पक्षाचे सदस्य निवृत्त व राजीनामा देतील त्यांच्या जागेवर त्याच पक्षाचे सदस्य जातील, असे त्यांनी सांगितले. त्यास आघाडीच्या गटनेत्या शानेहिंद व डॉ. खालीद यांनी याबाबत हरकत घेतली. विशेष महासभेत स्थायी समिती सदस्यांबरोबरच महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. शिवसेनेतर्फे गटनेते राजाराम जाधव, नगरसेविका आशा अहिरे व कविता बच्छाव यांना संधी मिळाल्याने श्री. जाधव व श्रीमती अहिरे यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत आहे. 

समितीतील महागठबंधन आघाडीचे एक पद रिक्त

सोयगाव नववसाहत भागातील नीलेश आहेर हे उपमहापौर असल्याने श्री. जाधव यांचा या पदावरील दावा मजबूत आहे. ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे व कल्पना वाघ यांचा भ्रमनिरास झाला. उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे सभास्थानी होते. महासभेला सुरवात होताच विरोधी पक्षनेते अतिक अहमद यांनी आघाडीच्या गटनेते व नावासंदर्भात हरकत घेतली. गटनेतेपदावरून २० ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे सुनावणी असल्याचे ते सांगत होते. यानंतर गटनेत्यांनी बंद पाकिटात दिलेली नावे श्रीमती शेख यांनी जाहीर केली. समितीतील महागठबंधन आघाडीचे एक पद रिक्त आहे. 

नवनियुक्त स्थायी समितीत सदस्य 
 
राजाराम जाधव, आशा अहिरे, कविता बच्छाव (शिवसेना), नंदकुमार सावंत, जैबुन्निसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, नईम पटेल शेख इब्राहिम, सुलतान माेहंमद हारुण (काँग्रेस), जाहिद शेख जाकीर, तन्वीर अन्सारी, मोहम्मद मुश्‍तकीम डिग्निटी, सबिहा अन्सारी (महागठबंधन आघाडी), तुळसाबाई साबणे, छायाबाई शिंदे (भाजप), डॉ. खालीद परवेज (एमआयएम). 

हेही वाचा > विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नवनियुक्त महिला बालकल्याण समिती सदस्य 

कमरुन्निसा मोहम्मद रिजवान, सलिमाबी सय्यद सलीम, रिहानाबानो ताजोद्दीन (काँग्रेस), मन्सुर अहमद अन्सारी, आसेफा राशीद अन्सारी, अफसरुन्निसा आरिफ सलोटी (महागठबंधन आघाडी), प्रतिभा पवार (शिवसेना), सुवर्णा शेलार (भाजप), सादिया लईक हाजी (एमआयएम)  

हेही वाचा > हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New faces in Malegaon Municipal Corporation Standing Committee nashik marathi news