नाशिकमध्ये नवीन विद्युतदाहिनी कार्यान्वित;  महिनाभरात तीस अंत्यसंस्कार 

युनूस शेख
Wednesday, 21 October 2020

जुने नाशिक भागातील अमरधाममधील अतिरिक्त विद्युतदाहिनी उभारण्याचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होऊन ती कार्यान्वित करण्यात आली. महिनाभरात सुमारे ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नाशिक : जुने नाशिक भागातील अमरधाममधील अतिरिक्त विद्युतदाहिनी उभारण्याचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होऊन ती कार्यान्वित करण्यात आली. महिनाभरात सुमारे ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नवीन विद्युतदाहिनी कार्यान्वित; महिनाभरात तीस अंत्यसंस्कार 
सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यात सामान्य आजार किंवा नैसर्गिक मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने मृतांचा आकडा वाढला होता. मृतदेहांना वेटिंगवर ठेवण्याची वेळ आली होती. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता अमरधाममध्ये गॅस किंवा विद्युतदाहिनीवरच अंत्यसंस्कार केले जातात. एका मृतदेहास सुमारे दीड तास लागत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. मृतदेहांची हेळसांड होऊ नये म्हणून महापालिकेकडून नवीन विद्युतदाहिनीच्या कामास सुरवात केली. २० सप्टेंबरपासून दाहिनी प्रत्यक्ष कार्यान्वित झाली. त्यामुळे विद्युत आणि गॅस दाहिनींवर पडणारा ताण कमी झाला. सध्या दोन विद्युत दाहिनी, एक गॅस दाहिनी आणि १४ खाटा पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध आहेत.  

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New power plant operational in Nashik marathi news