धक्का बसला..पण नंतर 'त्या' तान्हुल्यामुळे कोविड सेंटरमध्ये अचानक पसरले आनंदाचे वातावरण! नेमके काय घडले?

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

प्रसूती झालेल्या या मातेचे सीझर झालेले होते.  नवजात शिशू, माता व दोघे भावंडे पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात लक्षात आले. बाळासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. भामरे यांची नियुक्ती करतानाच कुटुंबाला स्वतंत्र रूम व काळजीवाहू कुटुंबप्रमुखास दररोज पीपीई किट उपलब्ध करून दिले. त्यानंतर जो चमत्कार घडला त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.

नाशिक / मालेगाव : प्रसूती झालेल्या या मातेचे सीझर झालेले होते.  नवजात शिशू, माता व दोघे भावंडे पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात लक्षात आले. बाळासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. भामरे यांची नियुक्ती करतानाच कुटुंबाला स्वतंत्र रूम व काळजीवाहू कुटुंबप्रमुखास दररोज पीपीई किट उपलब्ध करून दिले. त्यानंतर जो चमत्कार घडला त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.
 

दररोज पीपीई किट
प्रसूती झालेल्या या मातेचे सीझर झालेले होते. नवजात शिशू, माता व दोघे भावंडे पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात लक्षात आले. बाळासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. भामरे यांची नियुक्ती करतानाच कुटुंबाला स्वतंत्र रूम व काळजीवाहू कुटुंबप्रमुखास दररोज पीपीई किट उपलब्ध करून दिले. प्रशासनाने, वैद्यकीय पथकाने घेतलेली काळजी, खाणे, पिणे, राहणे सर्व जीवनाश्‍यक सुविधा घरासारख्या उपलब्ध करून दिल्यामुळे कुटुंब कोरोनामुक्त झाल्याने संबंधितांनी सांगताना प्रशासनाचे आभार मानले. 

 
बसला धक्का, मात्र योग्य उपचारामुळे वाचलो 
नवजात बालकाच्या आईने आठ वर्षांची मुलगी, साडेचार वर्षांचा मुलगा व माझ्यासह बाळही कोरोनाबाधित असल्याचे समजल्यावर मला धक्का बसला. मात्र यंत्रणेने धीर देत योग्य ते उपचार करून सर्व सुविधा देत कुटुंब वाचविले. महापौर शेख यांनी लहान मुलांना पेन्सिल, पेन, चॉकलेट साहित्य भेट दिले. कुटुंबाची आस्थेने विचारपूस करीत शुभेच्छा देत घरीही काळजी घेण्याचा सल्ला दिला. 

चौदाव्या दिवशी कोरोनामुक्त

कोरोना हॉटस्पॉट ठरल्यानंतर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या शहरात जन्मत: कोरोनाबाधित असलेले नवजात बाळ, त्याचे दोन भाऊ-बहीण, आईसह एकाच कुटुंबातील चार सदस्य बुधवारी (ता. 17) चौदाव्या दिवशी कोरोनामुक्त झाले. नवजात बाळासह कुटुंबीयांनी कोरोनावर मात केल्याने हज हाउस कोविड केअर हेल्थ सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचा हुरूप

हज हाउस सेंटरमधून बुधवारी (ता. 17) बुधवारी दुपारी महापौर ताहेरा रशीद शेख, आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले, डॉ. दानिश, डॉ. परवेज फैजी, दत्तात्रेय काथेपुरी, डॉ. स्वप्नील खैरनार, डॉ. सोहेल अन्सारी, व्यवस्थापक खरे आदींच्या उपस्थितीत या कुटुंबीयांवर पुष्पवर्षाव करीत त्यांना महापालिका रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. येथील 85 वर्षांच्या वयोवृद्धापासून नवजात शिशू कोरोनामुक्त झाल्याने वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचा हुरूप वाढला आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

व्यक्तिगत लक्ष केंद्रित केल्यामुळे कोरोनामुक्त 
या महिलेचे अलीअकबर रुग्णालयात सीझर झाले. तपासणीत मातेसह दोन्ही लहान मुले आणि नवजात शिशू कोरोनाबाधित आढळले. महिलेला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रथम सामान्य रुग्णालयात व तीन दिवसांनंतर फरहान हॉस्पिटलला ठेवण्यात आले. त्यानंतर हज हाउसला आणण्यात आले. हज हाउसला ईसीजी, ऑक्‍सिजन, सक्‍शन मशिन, एक्‍स रे या वैद्यकीय सुविधेसह 47 बेड, तीन स्वतंत्र रूम आहेत. दिवसातून तीन वेळा संपूर्ण सेंटर निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. रुग्णांकडे व्यक्तिगत लक्ष ठेवण्यात आल्याने येथील बहुसंख्य रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. -व्यवस्थापक खरे 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn baby battle with corona virus nashik marathi news