ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास विकासासाठी ५० लाखांपर्यंत निधी

दिगंबर पाटोळे
Monday, 28 December 2020

दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून, ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध केल्यास त्यांना एक महिन्याच्या आत गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून २५ ते ५० लाख रुपये देण्यात येतील

वणी (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून, ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध केल्यास त्यांना एक महिन्याच्या आत गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून २५ ते ५० लाख रुपये देण्यात येतील, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.

गावाला एक महिन्याच्या आत निधी

तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असावा व गावाचाही विकास करून घेण्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून, गट-तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ४ जानेवारीला माघारी असून, तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात आणि ज्या ग्रामपंचायतीच्या सर्व जागा बिनविरोध होतील त्या पाच हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला एक महिन्याच्या आत २५ लाख व पाच हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about gram panchayat election contestant nashik marathi news