इगतपुरीतील ३२ ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर 

विजय पगारे 
Thursday, 28 January 2021

तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज (ता.२८) पीठासन अधिकारी तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर झाले. या सरपंचपदाच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज (ता.२८) पीठासन अधिकारी तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर झाले. या सरपंचपदाच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी पंचायत समिती सभागृहात आरक्षण निश्चित करण्यात आले. 

सरपंच पद कोणाकडे जाणार?

तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती असून, ६४ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात आहेत. तर, उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. या अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले. त्यात अनुसूचित जाती- जमातीसाठी, ओबीसी, सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह अन्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरपंचपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रामपंचायतीत सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, आरक्षणानुसार सरपंच पद कोणाकडे जाणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल
 

ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण : 

अनुसूचित जाती : कुऱ्हेगाव, मुरंबी 
अनुसूचित जमाती : मुकणे, गोंदें दुमाला, समनेरे 
नागरिकाचा मागास वर्ग : भरवीर बुद्रूक, पिंपळगाव घाडगा निनावी, साकूर, शेनीत, नांदूरवैद्य, मुंढेगाव, मालुंजे, जानोरी. 
सर्वसाधारण प्रवर्ग : शेणवड खुर्द, गरुडेश्वर, कृष्णनगर, लक्ष्मीनगर, घोटी खुर्द, कावनई, वाडीवऱ्हे, पिंपळगाव डुकरा, नांदगाव बुद्रूक, पाडळी देशमुख, शिरसाठे, मोडाळे, वाघेरे माणिकखांब, सांजेगाव, बेलगाव कुऱ्हे, दौडत, भरवीर खुर्द. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Igatpuri gram panchayat reservation Nashik news