त्र्यंबकेश्वरला ‘नो मास्क नो एन्ट्री’ला हरताळ; नियम फक्त भाविकांनाच! 

Trimbakeshwar
Trimbakeshwar

नाशिक : कोरोनाच्या लॉकडाउनपासून तर शिथिलीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासकीय यंत्रणेकडून नियमावली जाहीर केली जाते. त्यानुसारच सामान्यांनी वागावे ही प्रशासकीय यंत्रणेची अपेक्षा असते. मात्र याच नियमाचा प्रशासकीय यंत्रणेतील भाऊसाहेब उघडउघड उल्लंघन करतात. अगदी देवाच्या दारीही प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचीच मुजोरी असेच चित्र अनुभवास मिळाले. 

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख स्थान असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये त्र्यंबकराजाच्या दर्शनाला रविवार (ता. २४)सह सलग सुट्या आणि एकादशीमुळे मोठी गर्दी होती. मात्र त्यात खटकण्यासारखी बाब म्हणजे सगळे भाविक सामान्य नागरिक दक्षिण दरवाजातून नव्या नियमाप्रमाणे २०० रुपये भरून आणि यंत्रणेच्या नियमानुसार मास्कपासून तर सगळी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन मंदिरात प्रवेश करत होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाने सगळ्यांसाठी, तर दोनशे रुपये पेड दर्शन वेळ नसणाऱ्यांसाठी सोय केली आहे. येथे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची व व्हीआयपी लोकांची वर्दळ असते. सर्वसामान्य लोकांना मास्क लावा, सॅनिटायझिंग करा, असे फर्मान सोडून आत जाण्यासाठी मज्जाव केला जातो.

नियम फक्त सामान्यांसाठीच का?

परंतु अधिकारी वर्ग आपल्या अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी सगळे नियम पायदळी तुडवून व आपल्या पदाचा गैरवापर करून येथील मंदिरात व इतर ठिकाणी सरबराई करीत फिरत असतात. रविवारी येथे मोठी गर्दी असताना महसूल कर्मचारी सुटी असतानाही सरबराई करण्यासाठी सगळे नियम धाब्यावर बसवून धावपळ सुरू असते. सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात खेट्या मारावयास लावणारे हेच कर्मचारी सुटी असूनही स्थानिक महसूल अधिकारी मात्र नो मास्क, नो एन्ट्रीच्या फलकाजवळच विनामास्क आप्तस्वकीयांच्या एन्ट्रीसह त्यांच्या सरबराईत कोरोनाविषयक सगळे नियम तोडून लोकांना सोडण्याचे काम करीत होते. त्यामुळे रविवारी भाऊसाहेबांच्या नियमबाह्य कामाचीच त्र्यंबकराजाच्या दक्षिण दारी चर्चा होती. त्यामुळे उपस्थितांसह सगळ्यांना प्रश्न पडला होता, की नियम फक्त सामान्यांसाठीच का? अधिकाऱ्यांना व त्यांच्या आप्तांना नियम नाहीत का, असा प्रश्न सामान्य भाविक उपस्थित करीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com