सिन्नरला सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर; दोन टप्प्यांत होणार ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा फैसला

Sarapanch election
Sarapanch election

सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नव्या कारभाऱ्यांकडे गावाची सत्ता येण्यासाठी तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली. सरपंचपदाच्या महिला आरक्षण सोडतीनंतर दोन आठवडे न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यामुळे सिन्नर तालुक्यातील सरपंच निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर याबाबतच्या तक्रारी निकाली निघाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरपंच निवडीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.

यानुसार सिन्नर तालुक्यात २५ व २६ फेब्रुवारीला दोन टप्प्यांत शंभर गावांतील ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. 
तालुक्यात एकाच वेळी शंभर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमुळे संपूर्ण तालुक्यातील राजकारण ढवळून निघाल्याचे बघायला मिळाले. अनेक मातब्बरांना पराभवाची धूळ चाखावी लागली, तर नवख्या नेतृत्वाच्या हाती मतदारांनी अनेक गावांची सत्ता सोपविली. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर महिला राखीव सरपंचपदासाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीवर आक्षेप घेत तालुक्यातील दहिवडी व पुतळेवाडी या गावांतील ग्रामस्थ उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, त्यांचे अर्ज निकाली काढत न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम ठेवला असून, सरपंच निवडणुकीच्या मार्गातील अडसर दूर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी काढलेल्या सुधारित आदेशानुसार सिन्नर तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्व १०० गावांतील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठीचा कार्यक्रम तहसीलदार राहुल कोताडे यांनी घोषित केला आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारीला ५१, तर २६ फेब्रुवारीला उर्वरित ४९ गावांत सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. 

२५ फेब्रुवारीला निवडणूक होणारी गावे 
दोडी बुद्रुक, जायगाव, चास, बारागाव पिंप्री, पांगरी बुद्रुक, धारणगाव, विंचूरदळवी, पास्ते, वावी, सोमठाणे, निऱ्हाळे, वडांगळी, गुळवंच, पुतळेवाडी, डुबेरे, सोनांबे, मलढोण, पाथरे खुर्द, कोनांबे, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, खोपडी बुद्रुक, मानोरी, श्रीरामपूर, धुळवड, चंद्रपूर, भरतपूर, नायगाव, शिवाजीनगर (कहांडळवाडी), जोगलटेंभी, पाडळी, सोनारी, गोंदे, बोरखिंड, फुलेनगर, भोकणी, दोडी खुर्द, धोंडबार, यशवंतनगर (पिंपरवाडी), आगासखिंड, मिठसागरे, कुंदेवाडी, देशवंडी, दहीवाडी, पाटोळे, चापडगाव, केपानगर, मिरगाव, मनेगाव, दापूर, आडवाडी. 

२६ फेब्रुवारीला निवडणूक होणारी गावे 
शिवाजीनगर (दापूर), सुळेवाडी (सुंदरपूर), नळवाडी, वडझिरे, पांगरी खुर्द, देवपूर, हिवरगाव, जामगाव, सांगवी, कोमलवाडी, कणकोरी, निमगाव देवपूर, निमगाव सिन्नर, माळेगाव/मापारवाडी, सावतामाळीनगर, सरदवाडी, पाथरे बुद्रुक, बेलू, रामनगर, आटकवडे, पंचाळे, शिवडे, सुरेगाव, कोळगावमाळ, कासारवाडी, औंढेवाडी, सोनगिरी, पिंपळगाव, पांढुर्ली, पिंपळे, चिंचोली, हिवरे, वारेगाव, आशापुरी (घोटेवाडी), चोंढी, हरसुले, खंबाळे, ब्राह्मणवाडे, मेंढी, मुसळगाव/गुरेवाडी, दातली, फर्दापूर, वडगाव सिन्नर, सोनेवाडी, खडांगळी, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, दत्तनगर, घोरवड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com