शिवसेनेच्या तटबंदीला सुरुंग..! 'या' कारणावरून नाराजी... 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 25 February 2020

महासभेत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या असलेल्या एकीला नगरसेवकांच्या नाराजीतून जोरदार तडाखा बसला. स्थायी समितीवर सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची नावे आल्याने ठराविक लोकांभोवतीच पदे फिरत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसले. भाजपच्या बंडखोरीवर हसणाऱ्या शिवसेनेलाच येत्या काळात गळती लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नाशिक : महासभेत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या असलेल्या एकीला नगरसेवकांच्या नाराजीतून जोरदार तडाखा बसला. स्थायी समितीवर सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची नावे आल्याने ठराविक लोकांभोवतीच पदे फिरत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसले. भाजपच्या बंडखोरीवर हसणाऱ्या शिवसेनेलाच येत्या काळात गळती लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शिवसेनेच्या तटबंदीला सुरुंग 

स्थायी समिती सदस्यत्त्वासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेत शिवसेनेकडून नावे जाहीर करताना महापौरपदाच्या शर्यतीतील माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची नावे जाहीर झाली. तौलनिक संख्याबळाच्या आधारे एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याची शिवसेनेची मागणी होती. त्यानुसार ज्योती खोले यांचे नाव तिसऱ्या सदस्यासाठी देण्यात आले होते. परंतु महापौर सतीश कुलकर्णी यांनी बडगुजर व गाडेकर या दोघांचीच नावे जाहीर केली. आतापर्यंत शिवसेना एकसंध असल्याचे मानले जात होते. विधानसभा व महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून याला सुरुंग लागत आहे.

स्थायी सदस्यत्त्वावरून नाराजी 

शहर बससेवेवरून काही दिवसांपूर्वी शहर संघटक बाळासाहेब कोकणे यांनी संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर सोमवारी (ता. 24) नगरसेविका पूनम मोगरे यांचे पती दिंगबर मोगरे यांनीही विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत विशिष्ट लोकांनाच वारंवार पदे दिली जात असल्याचा आरोप मोगरे यांनी केला. बोरस्ते यांनी मोगरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

ऐनवेळी मटालेंचा पत्ता कट 
स्थायी सदस्यत्त्वासाठी सिडकोतून नगरसेविका सुवर्णा मटाले यांचे नाव आघाडीवर होते. सभागृहात नावांची घोषणा होण्याअगोदर मटाले यांचे नाव होते; परंतु महापौरांच्या घोषणा चिठ्ठीतून अचानक त्यांचे नाव गायब झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. महत्त्वाची पदे ठराविक लोकांभोवतीच फिरत आहेत. त्याशिवाय साधे निवेदन द्यायचे झाले तरी विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नसल्याचे उघड बोलले जात आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक शांत झाला..आईने पाहिले तेव्हा तिचे पाय टबमध्ये होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about shivsena Angry on standing commitee decision Nashik Marathi News