नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

sanjay raut 1.jpg
sanjay raut 1.jpg

नाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत मिडियाशी संवाद साधत होते. 

निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय

मुंबई आणि नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असेल. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्यानं रचना करावी लागतेय, बदल करावे लागणार आहेत. त्याची नाशिकपासून सुरुवात केलीय. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढल्याचा फायदा झालाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही आम्ही लढणारे आहोत.

महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती, त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले.केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात, त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मलिन झाली आहे, शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केलेलं नाही, ते शेतकऱ्यांचंच आंदोलन.. तुम्ही कोणतीही हत्यारं वापरा, महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही आम्ही लढणारे आहोत. ते सर्व पंजाब, हरियाणाचे शेतकरीसरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकलेलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकारने शरणागती पत्करली असं होत नाही.ईडी, सिबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये. युपीएचं नेतृत्व कुणी करावं, यावर नेहमी चर्चा होत असते, मात्र निर्णय नाही. 

नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते

संविधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तयार केलेलं नाही.कायदा बदलता येऊ शकतो.नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते
 भाजपवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे बांबू सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड ठरवणं, यात गैर काही नाही. राज्यपालांवर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास घटनेवर आहे असे राऊत म्हणाले

राज्यपालांचा सरकारमध्ये हस्तक्षेप नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाचाही घटनाबाह्य हस्तक्षेप सहन करत नाही
शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर देशाचे संरक्षण मंत्री का गप्प बसलेत.सरकार पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही.केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी.देशात जिथं भाजपचं सरकार नाही, तिथं केंद्र मदत करत नाही, हे बरोबर नाही .शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील नेत्यांच्या अडथळ्यांमुळे होऊ शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com