Nashik Corona Update : दिवसभरात ९१३ संशयित दाखल..तर बळींचा आकडा दहा

corona test 1234.jpg
corona test 1234.jpg

नाशिक : शहरासह जिल्ह्या‍तील विविध भागांमध्ये कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी (ता. २७) दिवसभरात ३५७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ४८८ झाला आहे. तर २६३ जण कोरोनामुक्‍त झाले असून, आतापर्यंत बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या नऊ हजार २९८ वर पोचली आहे. दिवसभरात कोरोनामुळे दहा रुग्‍णांचा बळी गेला आहे. विविध रुग्णालयांमध्ये ९१३ संशयित दाखल झाले आहेत. 

नाशिकमध्ये दिवसभरात ९१३ संशयित दाखल 

सोमवारी (ता. २७) आढळलेल्‍या ३५७ कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २१९, नाशिक ग्रामीणमध्ये ९५ कोरोनाबाधित असून, मालेगावला ११, तर जिल्‍हाबाह्य एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. बरे झालेल्‍या २६३ जणांमध्ये नाशिक शहरातील १७५, नाशिक ग्रामीणचे ७७, मालेगावचे आठ, तर जिल्‍हाबाह्य तीन जणांचा समावेश आहे. दहा मृत्‍यूंपैकी सहा नाशिक शहरातील असून, चार नाशिक ग्रामीणमधील आहेत. यातून मृतांचा आकडा ४६७ इतका झाला आहे. सिडको कॉलनी, लेखानगर येथील ७४ वर्षीय पुरुष, गणेशवाडी शेरी मळा येथील ५४ वर्षीय महिला, हिरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष आणि ५४ वर्षीय महिला, काझी गडी येथील ६० वर्षीय पुरुष, राजरत्‍ननगर येथील ६२ वर्षीय महिला, सातपूरच्‍या संजीवनगर येथील ३१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये टेंभे (ता. सटाणा) येथील ५७ वर्षीय महिला, शिरगाव लोकी येथील ६१ वर्षीय पुरुष, इगतपुरी येथील नया बझार येथील ५७ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

९१३ पैकी ५३५ रुग्ण नाशिक शहरातील

आतापर्यंत नऊ हजार २९८ रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून, सद्यःस्थितीत दोन हजर ७२३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत आठशे संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान, दिवसभरात ९१३ संशयित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यांपैकी ५३५ रुग्ण नाशिक शहरातील आहेत, तर २१८ रुग्ण नाशिक ग्रामीण, नऊ रुग्ण मालेगाव महापालिका हद्दीतील असून, १५१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. 

रिपोर्टर - अरुण मलाणीॉ

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com