नऊ वर्षाच्या चिमुरड्यासोबत झालेल्या अमानुष कृत्याने नाशिक हादरले! अंगावर काटा आणणारी घटना

kidnapp nine years boy.jpg
kidnapp nine years boy.jpg

नाशिक रोड : रात्री दीडच्या सुमारास विशाल ओमिनी गाडी घेऊन घरी आला. त्यास चिमुरड्या रामजीबाबत विचारणा केली असता, मी रामजीला मंदिराजवळ सोडले होते, असे विशालने सांगितले. पण सत्य जेव्हा समजले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली होती. काय घडले नेमके?

घडलेल्या प्रकाराने पायाखालची जमीन सरकली...

मंगळवारी (ता.१) ओमनी गाडीत संशयिताच्या आईला देण्यासाठी भाजीपाला आणला होता. शेजारी राहणाऱ्या विशाल विष्णू गेजगे याने नऊ वर्षाचा चिमुरडा रामजी यादव याला ओमिनी गाडीत नेले होते. मात्र, मुलगा घरी आलाच नाही. त्यामुळे रामजीचे वडिल लालाबाबू यादव यांनी कामावरून घरी येताच मोटारसायकलद्वारे पोलिस ठाण्यासमोरील टिळक पथ गाठले. तेथे विशालच्या आईकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी विशाल व स्वप्नील, वसंत सोनवणे याच्याबरोबर रामजीला ओमिनी गाडीत घेऊन गेला असून, घरमालकाचे किराणा साहित्य घेऊन ते घरी गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत रामजी सापडला नाही.

लुटमारीची घटना पाहिली म्हणून चिमुरड्याला मिळाली मोठी शिक्षा

रात्री दीडच्या सुमारास विशाल ओमिनी गाडी घेऊन घरी आला. त्यास रामजीबाबत विचारणा केली असता मी रामजीला मंदिराजवळ सोडले होते, असे विशालने सांगितले. त्यावरून रात्रभर शोध घेतला, तरीही तो सापडला नाही. त्यानंतर लालाबाबूंनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, रामजीला पळवून नेल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या दोघांनी माहिती दिली. त्यानुसार रामजी यादवला घेऊन ते ओमिनी कारमधून शिवाजी पुतळा येथे गेले. तेथे एका व्यक्तीला सिन्नरला जायचे आहे का, अशी विचारणा करत गाडीत बसवले. पुढे गेल्यावर स्वप्नीलच्या मदतीने त्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व चार हजार रुपये काढून घेतले व तेथून निघून गेले.

खून व लुटीचा गुन्हा दाखल

दरम्यान, हा प्रकार चिमुरड्या रामजीने बघितला होता. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने विशालने स्वप्नीलला उतरवत, रामजीला नायगाव रोडने नेऊन तेथे रामजीचा गळा दाबून खून केला. ही माहिती विशालनेच पोलिसांना दिली. त्याच्या विरोधात खून व लुटीचा गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयाने त्यास ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे नाशिक रोडचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले. तसेच, लुटीच्या प्रकरणात स्वप्नील सोनवणेला अटक झाली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, गणेश न्याळदे, सहाय्यक निरीक्षक शेळके आदींनी घटनास्थळी भेट दिली. संशयित विशालला कडक शासन करण्याची मागणी उत्तर भारतीय नागरिकांनी बिजली यांना भेटून केली.

उत्तर भारतीय नागरिकांची पोलिस ठाण्यात गर्दी

प्रवाशाला चाकू लावून लुटमारीची घटना पाहिली म्हणून, सामनगाव रोडवरील गाडेकर मळ्यात नऊ वर्षांच्या बालकाला आपला जीव गमावावा लागला. या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी संशयित विशाल गेजगे याला अटक केली असून, त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तत्पूर्वी संशयिताला अटक करण्याच्या मागणीसाठी उत्तर भारतीय नागरिकांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. वाचा नेमके काय घडले?गाडेकर मळा येथील लालाबाबू सीताराम यादव यांचा मुलगा रामजी यादव (वय ९) याचे अपहरण व खूनप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या विशाल विष्णू गेजगे याच्या मुसक्या आवळल्या आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com