निफाड अद्यापही कोरोना तपासणी केंद्राविनाच; आरोग्य विभागाला सूचनेचा विसर

माणिक देसाई
Wednesday, 23 September 2020

शहरात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुख्य उपस्थितीत झाला. तेव्हा निफाड येथे कोविड ॲन्टिजेन चाचणीला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र या घोषणेला सहा दिवस उलटूनही अद्यापही याची अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. 

नाशिक : (निफाड) तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या जोरात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोना तपासणी सेंटर सूरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आरोग्य विभागाला केली होती. मात्र, रुग्णसंख्या वाढत असतानादेखील अद्यापही तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी सेंटर सुरू करण्यात न आल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचनेचा विसर पडल्याचे चित्र तालुक्यात आहे. 

सहा दिवस उलटूनही अद्यापही याची अंमलबजावणी नाहीच
 
निफाड तालुक्यात आतापर्यंत दोन हजार ६६८ कोरोना रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी एक हजार ८९३ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. मंगळवारअखेर तालुक्यात ७०१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, ७४ व्यक्तींना कोरोनामुळे मृत्यू आला. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुख्य उपस्थितीत झाला. तेव्हा निफाड येथे कोविड ॲन्टिजेन चाचणीला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र या घोषणेला सहा दिवस उलटूनही अद्यापही याची अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

तालुक्यात पिंपळगाव बसवंत व लासलगाव येथे कोविड सेंटर आहे. मात्र तालुक्याच्या मुख्यालयी कोविड सेंटर नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. यातच खासगी रुग्णालयाचा खर्च नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे तातडीने येथे कोविड सेंटर सुरू करा. - जावेद शेख, नगरसेवक 

निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. रोहन मोरे यांनी निफाड उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय नाही. त्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे ॲन्टिजेन तपासणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जागा मिळताच पुढील कार्यवाही होईल. - डॉ. रोहन मोरे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय  

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Niphad still does not have a corona inspection center nashik marathi news