नाशिककरांनो चिंता नको! नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग नाही

विनोद बेदरकर
Tuesday, 19 January 2021

ज्या जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आधीच झाला आहे तेथून नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतेही कोंबडी अथवा कोंबडीजन्य पदार्थ आणण्यावर बंदी आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप कोणताही संसर्ग झालेला नाही

नाशिक : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व कोंबडीजन्य पदार्थांच्या आवकसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून, बर्ड फ्लू असलेल्या जिल्ह्यातील कोंबड्यांना नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशात म्हटले आहे. 

नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग नाही : मांढरे 
ज्या जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आधीच झाला आहे तेथून नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतेही कोंबडी अथवा कोंबडीजन्य पदार्थ आणण्यावर बंदी आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप कोणताही संसर्ग झालेला नाही. यामुळे नाशिक जिल्ह्यातून कोंबडी व कोंबडीजन्य पदार्थ बाहेर पाठविण्यावर कोणतीही बंदी नाही. 
तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये चिकनचे खाद्यपदार्थ म्हणून वापर करण्यावरही कोणतेही निर्बंध नाहीत, असेही मांढरे यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no bird flu infection in Nashik district marathi news