नाशिकमध्ये नो कोरोना! पण कोरोनाग्रस्त देशांतून आले "इतके' नागरिक.. 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 28 मार्च 2020

आतापर्यंत कोरोनाग्रस्त नागरिकांच्या संपर्कात आलेले तीन नागरिक आहेत. रुग्णालयात पन्नास नागरिक दाखल झाले असून, पन्नास नागरिकांना घरी पाठविण्यात आले आहेत. या 50 जणांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. पण 'इतक्या' नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे.  

नाशिक : कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांची संख्या नाशिकमध्ये वाढत असून, आतापर्यंत 366 नागरिक दाखल झाले आहेत. कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांचे होम क्वारंटाइन करण्यात आले असून, सुदैवाने नाशिकमध्ये एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. 

कोरोनाग्रस्त देशांतून नाशिकमध्ये 366 नागरिक 
आतापर्यंत 366 नागरिक कोरोनाग्रस्त देशातून आले आहेत. त्यात यूएईमधून सर्वाधिक 98 नागरिक आले. इटलीतून सात, इराणमधून एक, सौदीमधून तीन, जर्मनी तेरा, चीन दोन, यूएसएमधून 34, यूकेमधून 33, तर इतर देशांतून 175 असे एकूण 366 नागरिक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. 366 पैकी चौदा दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 41 असून, दैनंदिन 325 नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे.

हेही वाचा > 'कोरोनाला घाबरा, करणीला नाही!'...अन् करणी केलेलं 'त्या' साहित्यातील लिंबू 'त्यांनी' तिथंच खाऊन दाखवला

यूएईमधून सर्वाधिक; सर्वांचे होम क्वारंटाइन 

आतापर्यंत कोरोनाग्रस्त नागरिकांच्या संपर्कात आलेले तीन नागरिक आहेत. रुग्णालयात पन्नास नागरिक दाखल झाले असून, पन्नास नागरिकांना घरी पाठविण्यात आले आहेत. या 50 जणांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. 331 नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे.  

हेही वाचा >जेव्हा "नगरसेविका" प्रभागात गल्लोगल्ली औषध फवारणी करतात.. तेव्हा न्यायाधिश देखील करतात कौतुक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Corona patient in Nashikb But so many citizens came from other countries nashik marathi news