"इथे भरती तर आहे...पण कोणी यायलाच मागत नाही?..उलटे चित्र..! 

Recruitment 1.jpg
Recruitment 1.jpg

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची इभ्रत निघाली. मनुष्यबळ नसल्याने विभागाकडून तत्काळ भरतीची ऑनलाइन जाहिरात काढण्यात आली. एरवी नोकरीची जाहिरात निघाल्यावर त्या जागांवर तुटून पडत मिळेल त्या माध्यमातून नोकरी मिळवायची, असा खटाटोप सुरू असताना या भरतीत मात्र उलटे चित्र बघायला मिळत आहे. ​

हम बुलाते है वो आते नही... 

कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची इभ्रत निघाली. मनुष्यबळ नसल्याने विभागाकडून तत्काळ कोविड 19 भरतीची ऑनलाइन जाहिरात काढण्यात आली. एरवी नोकरीची जाहिरात निघाल्यावर त्या जागांवर तुटून पडत मिळेल त्या माध्यमातून नोकरी मिळवायची, असा खटाटोप सुरू असताना कोविड 19 भरतीत उलटे चित्र बघायला मिळत आहे. नाशिक विभागात कोविड 19 अंतर्गत विविध पदांसाठी दोन हजार 47 जागांची जाहिरात असताना प्रत्यक्षात 204 उमेदवारच रुजू झाले आहेत. गंमत म्हणजे आलेल्या अर्जांपैकी 882 उमेदवार पात्र असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांना रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले होते. प्रत्यक्षात 204 रुजू झाले. 

जाहिरातींना प्रतिसादच नाही..
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कमी पडत असलेल्या मनुष्यबळाला आधार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एप्रिलमध्ये कोविड 19 ही तातडीची भरती जाहीर करण्यात आली. यातील पदे कंत्राटी जरी असले तरी नोकरी मिळविण्याची स्पर्धा याही पदांसाठी सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तरुण होतकरू वर्ग नोकरीसाठी जाहिरातींना प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एप्रिल, मे व जून उलटून गेल्यावरही या जाहिरातींना प्रतिसाद मिळत नाही. 

उमेदवारांना जिवाची भीती 
नाशिक विभागात कोविड 19 भरतीच्या एकूण दोन हजार 47 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. आलेल्या अर्जांपैकी केवळ 882 उमेदवार त्या- त्या पदासाठी पात्र ठरले होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु आदेश मिळूनही प्रत्यक्षात 204 उमेदवार रुजू झाले आहेत. संबंधित पदे कंत्राटी असल्याने या नोकरीसाठी जीव कसा धोक्‍यात घालावा, असा प्रश्‍न संबंधित उमेदवारांना पडला असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..

या पदांचा आहे समावेश 
कोविड 19 भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, वॉर्डबॉय आदी विविध पदांचा समावेश आहे. 
 
...अशी आहे विभागाची स्थिती 
जिल्हा एकूण जागा आदेशित उमेदवार रुजू उमेदवार 

नाशिक 719 415 68 
नगर 463 132 15 
जळगाव 542 101 73 
धुळे 151 92 39 
नंदुरबार 172 142 9 

कोविड भरतीत 882 उमेदवारांना आदेश, प्रत्यक्षात 204 हजर 

उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज केले; परंतु कोविडच्या भीतीमुळे ते रुजू होण्यास टाळाटाळ करीत आहे. सुरवातीला मालेगाव हॉटस्पॉट होता. त्यानंतर नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविडशी निगडित कामे करण्यासाठी उमेदवार धजावत नाहीत. आता वॉक इन इंटरव्हूच्या माध्यमातून शल्यचिकित्सकांना उमेदवारांची भरती करण्याचे अधिकारी मिळाले आहे, तरीदेखील प्रतिसाद नाही. -डॉ. मलिकार्जुन पट्टनशेट्टी, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com