esakal | "आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

aaditya thakre and bhujbal.jpg

आदित्य ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही अशी भुमिका मांडत भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना क्लिनचीट दिली आहे.

"आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदित्य ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही अशी भुमिका मांडत भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना क्लिनचीट दिली आहे.

पवार कुटुंबियांमध्ये कोणताही कलह नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार याबाबत भुजबळ यांना विचाले असता ते म्हणाले, पवार कुटुंबियांमध्ये कोणताही कलह नाही. कोणीही नाराज नाही. आम्हीही पवार कुटुंबियांपैकीच एक आहोत. पवार साहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत ते ज्येष्ठ आहेत. घरचा कोणी चुकला तर त्यांना समजावून सांगणे हे त्यांचे काम आहे. अगदी मी चुकलो तरी माझा कान ते धरतात आणि मला सुध्दा ऐकवतात असे ते म्हणाले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबध नाही. उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही.

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...