esakal | धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?...कारवाई तर होणारच...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

radhakrushna game.jpg

यापुर्वी नियुक्तीपत्रे घेतलेल्या ७० जणांना नोटीसा बजावाण्यात आल्या होत्या. त्यानंरही दखल न घेतल्याने त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवतं मेस्मा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्म गमे यांनी दिले आहेत. 

धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?...कारवाई तर होणारच...वाचा सविस्तर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागात फिजिशियनसह परिचारिका, मिश्रक, प्रयोगशाळातज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ अशा ८४९ पदांची जंबो भरती झाल्यानंतर नियुक्तीपत्रे देऊनही उमेदवार कामावर हजर होत नसल्याने अखेरीस २०० जणांना मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईच्या नोटीसा काढण्याच्या सुचना देण्यात आल्याने नियुक्तीपत्र घेतलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. 

२०० उमेदवारांना नोटीस 

ऑगस्टअखेर वीस हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता लक्षात घेवून महापालिकेच्या वतीने वैद्यकीय विभागात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, समुपदेशक अशा तब्बल ८४९ पदांसाठी जंबो भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. यात सर्वाधिक अडीचशे पदे स्टाफ नर्सची, तर बीएएमएस म्हणजेच आयुर्वेद पदवीधारकांसाठी शंभर जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. त्याचप्रमाणे मल्टिस्किल हेल्थ वर्करचीही शंभर पदे, एमबीबीएस ५० जागा व फिजिशियन दहा, भूलतज्ज्ञ दहा, मानसोपचारतज्ज्ञ ३०, रेडिओलॉजिस्ट अशा अत्यावश्यक पदांसाठी मुलाखतप्रक्रिया राबविण्यात आली. 

मेस्मा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल 

महापालिकेने ८४९ पैकी ७०८ जणांना विविध पदांसाठी नियुक्तीपत्रे दिली. परंतू त्यातील दोनशेहून अधिक पात्र उमेदवार कामावर हजर झाले नाही. यापुर्वी नियुक्तीपत्रे घेतलेल्या ७० जणांना नोटीसा बजावाण्यात आल्या होत्या. त्यानंरही दखल न घेतल्याने त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मेस्मा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्म गमे यांनी दिले आहेत. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

२०० जणांना नोटिसा 

यापुर्वी नियुक्तीपत्र घेतलेल्या सत्तर उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यात आता १३० ने वाढ होवून निवड प्रक्रियेतील हजर न झालेल्या दोनशे उमेदवारांना मेस्मा अंतर्गत नोटीसा देण्यात येणार असून त्यानंतरही हजर न झाल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

(संपादन - किशोरी वाघ)