राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा सुधारीत वेळापत्रका नुसार घेतली जाणार आहे. यासंदर्भात एमपीएससीमार्फत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. 

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा सुधारीत वेळापत्रका नुसार घेतली जाणार आहे. यासंदर्भात एमपीएससीमार्फत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. 

सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा घेतली जाणार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवितांना विविध परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ची तयारी झालेली असल्याने मार्च अखेरीस परीस्थितीचा अंदाज घेत 5 एप्रिलला परीक्षा घ्यायची की नाही, यासंदर्भात अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचे एमपीएससीमार्फत स्पष्ट करण्यात आले होते. राज्यातील परिस्थिती गंभीर बनलेली असतांना, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी संघटना, परीक्षार्थींकडून केली जात होती. त्याची दखल घेतांना व परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ही परीक्षा पुढे ढकलली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 26 एप्रिलला राज्यभरात घेतली जाणार आहे. फेर आढावा घेतल्यानंतर वेळोवेळी सुचना जारी केल्या जाणार असल्याचेही सांगितले आहे. 

हेही वाचा > COVID-19 : सिव्हिलमध्ये "कोविड-19'' व्यवस्थापन कक्ष...24 तास सुरू राहणार 'वॉर रूम'!

 संयुक्‍त पूर्व परीक्षा आता 10 मे रोजी

राज्यसेवा पूर्व परीक्षाप्रमाणेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्‍त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. तर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 10 मे रोजी घेण्याचे नियोजित आहे. 

हेही वाचा > मोबाईल हातात न दिल्याचाच राग...अन् त्याने केला धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice issued by MPSC: Examination on April 26 nashik marathi news