दिलासादायक! जिल्ह्यातील ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ३३३ ने घट...तर 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Thursday, 20 August 2020

बुधवारी (ता. १९) दिवसभरात नव्‍याने ८६४ रुग्‍ण आढळून आल्‍याने आतापर्यंतची रुग्णसंख्या २६ हजार ७७४ झाली आहे. तर एक हजार १९७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍यांची संख्या २२ हजार ४३ झाली आहे. यातून ॲक्टिव्ह रुग्‍णांची संख्या ३३३ ने घटली असून, सध्या कोरोनाचे चार हजार तीन सक्रिय रुग्‍ण उपचार घेत आहेत.

नाशिक : सलग पाचव्‍या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. बुधवारी (ता. १९) दिवसभरात नव्‍याने ८६४ रुग्‍ण आढळून आल्‍याने आतापर्यंतची रुग्णसंख्या २६ हजार ७७४ झाली आहे. तर एक हजार १९७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍यांची संख्या २२ हजार ४३ झाली आहे. यातून ॲक्टिव्ह रुग्‍णांची संख्या ३३३ ने घटली असून, सध्या कोरोनाचे चार हजार तीन सक्रिय रुग्‍ण उपचार घेत आहेत.

दिवसभरात आढळले ८६४

बुधवारी (ता. 20) दिवसभरात पंधरा जणांचा मृत्‍यू झाल्याने मृतांची संख्या ७२८ झाली आहे. नव्याने आढळलेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ६१०, ग्रामीण भागातील २१९, मालेगावचे ३४, तर जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा समावेश आहे. बरे झालेल्‍या एक हजार १९७ रुग्‍णांमध्ये सर्वाधिक ९९६ रुग्‍ण नाशिक शहरातील असून, ग्रामीणचे १७८, मालेगावचे २०, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍ण आहेत. जिल्ह्यात झालेल्‍या पंधरा मृत्‍यूंपैकी नाशिक शहरातील सात, ग्रामीणचे सहा, मालेगाव महापालिका व जिल्‍हाबाह्य प्रत्‍येकी एका रुग्‍णाचा समावेश आहे. जेल रोडच्‍या गणेशनगरमधील ५८ वर्षीय, नाशिक रोड परिसरातील ६० वर्षीय, पिंपळगाव बहुला येथील ३२ वर्षीय, जत्रा हॉटेल परिसरातील ६७ वर्षीय, अंबड परिसरातील ४४ वर्षीय पुरुष तसेच, इंदिरानगर येथील ७३ वर्षीय, श्रमिकनगर येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. 

उशिरापर्यंत एक हजार ५५६ अहवाल प्रलंबित

ग्रामीण भागात बाणगाव येथील ४२ वर्षीय, येवल्‍यातील ४२ वर्षीय, ठाणगाव (सिन्नर) येथील ४३ वर्षीय, ओझर येथील ६५ वर्षीय, इगतपुरीतील ६५ वर्षीय पुरुषाचा, तसेच मालेगावच्‍या गोळीबार मैदान परिसरातील ७८ वर्षीय पुरुष आणि पाचोरा (जि. जळगाव) येथील ६३ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५०, मालेगाव महापालिका व गृहविलगीकरणात २४, नाशिक गामीण व गृहविलगीकरणात २६०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १७, जिल्‍हा रुग्‍णालयात १२ संशयित रुग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ५५६ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

मालेगावला कोरोनाबळींचे शतक 

मालेगाव : शहरातील तीन कोरोनाबाधितांचा बुधवारी मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचे शतक पूर्ण झाले आहे. येथील ओंकार कॉलनी भागातील ७८ वर्षीय पुरुष, पंचशीलनगर भागातील ५६ वर्षीय महिला व एकतानगर भागातील ४८ वर्षीय महिलेचा सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर शहर व परिसरात ५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यातील बहुसंख्य रुग्ण ग्रामीण भाग व शहराच्या पश्‍चिम भागातील असून, २५ पुरुष व २६ महिलांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, नव्याने २४ रुग्ण दाखल झाले असून, शहरातील ५०८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of active corona patients in Nashik district decreased by 333 nashik marathi news