CoronaUpdate : ॲक्टिव्ह रुग्‍ण संख्येत जिल्ह्यात २५७ ने घट; ४८७ कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी
Monday, 2 November 2020

सोमवारी नव्‍याने आढळेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५३, नाशिक ग्रामीणचे ७१, मालेगावचे सात, तर जिल्‍हाबाह्य एक बाधित आढळून आला आहे.

नाशिक : जिल्ह्या‍त नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक राहात असल्‍याने ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत सातत्‍याने घट होत आहे. सोमवारी (ता.२) दिवसभरात २३२ बाधित आढळून आले असताना, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ४८७ राहिली. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत २५७ ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्या‍त तीन हजार ५६४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी नव्‍याने आढळेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५३, नाशिक ग्रामीणचे ७१, मालेगावचे सात, तर जिल्‍हाबाह्य एक बाधित आढळून आला आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ३७८, नाशिक ग्रामीणचे ९६, मालेगावचे ११, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात दोन रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, दोन्‍ही नाशिक ग्रामीण भागातील आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

यातून जिल्‍हाभरात आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार १४७ झाली असून, यापैकी ८८ हजार ९११ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ६७२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५१६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३०, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात आठ, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन, जिल्‍हा रुग्‍णालयात तीन रुग्‍ण दाखल आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ५६५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी २५२ अहवाल नाशिक ग्रामीण, तर २५२ अहवाल नाशिक शहरातील रुग्‍णांचे होते. ६१ अहवाल मालेगाव महापालिका हद्दीतील संशयित रुग्‍णांचे आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district decreased by 257 nashik marathi news