CoronaUpdate : ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत जिल्‍ह्यात २४ ने वाढ; दिवसभरात आढळले ५८२ बाधित

अरुण मलाणी
Wednesday, 14 October 2020

बुधवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३८१, नाशिक ग्रामीणचे १८४, मालेगावचे सहा तर जिल्‍हाबाह्य अकरा रूग्‍णांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात बुधवारी (ता.१४) दिवसभरात ५८२ कोरोना बाधित आढळून आले. तर ५५० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून आठ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत २४ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ७ हजार ६१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बुधवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३८१, नाशिक ग्रामीणचे १८४, मालेगावचे सहा तर जिल्‍हाबाह्य अकरा रूग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४०३, नाशिक ग्रामीणचे ११८, मालेगावचे २५, तर जिल्‍हाबाह्य चार रूग्‍णांचा समावेश आहे. आठ मृतांमध्ये नाशिक शहरातील चार तर नाशिक ग्रामीणच्‍या चौघा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून कोरोना बाधितांचा एकूण आकडा ८७ हजार १९१ वर पोहोचला असून, यापैकी ७८ हजार ०१९ रूग्‍ण कोरोनामुक्‍त झालेले आहेत. १ हजार ५५५ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९९८, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १२४, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा तर जिल्‍हा रूग्‍णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ०४१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ६२६ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांचे आहेत.  

 हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district increased by 24 nashik marathi news