जिल्ह्यात एकीकडे ॲक्‍टिव्‍ह रुग्ण वाढताएत; तर दुसरीकडे कोरोनामुक्‍ताची संख्याही दिलासादायक

अरुण मलाणी
Saturday, 22 August 2020

गेल्‍या आठवडाभरापासून कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याचे बघायला मिळत असताना शुक्रवारी (ता. २१) मात्र बाधितांची संख्या अधिक राहिली. नव्‍याने ७४६ कोरोनाबाधित आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या २८ हजार ४२३ झाली आहे, तर ४४० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत २३ हजार ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. 

नाशिक : गेल्‍या आठवडाभरापासून कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याचे बघायला मिळत असताना शुक्रवारी (ता. २१) मात्र बाधितांची संख्या अधिक राहिली. नव्‍याने ७४६ कोरोनाबाधित आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या २८ हजार ४२३ झाली आहे, तर ४४० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत २३ हजार ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. 

दिवसभरात ७४६ नवीन रुग्‍ण; ४४० रुग्‍ण कोरोनामुक्‍त 

दिवसभरात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत ३०६ ने वाढ झाली असून, सध्या चार हजार ३० बाधितांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. दहा रुग्‍णांचा दिवसभरात मृत्‍यू झाला असून, मृतांची संख्या ७५५ झाली. शुक्रवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ४९३, ग्रामीण भागातील २१३, मालेगावचे ३७, तर जिल्‍हाबाह्य तिघांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५०, नाशिक ग्रामीणचे २५७, मालेगावचे २९, तर जिल्‍हाबाह्य चार रुग्ण आहेत. दिवसभरातील दहा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील पाच, ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन रुग्‍णांचा समावेश आहे. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

एकूण एक हजार ९१९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित

दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६७४ रुग्‍ण, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात ३०७ रुग्‍ण, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयात २०, जिल्‍हा रुग्‍णालयात १२ संशयित रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक ग्रामीणचे एक हजार २३७, नाशिक महापालिका हद्दीतील २६२, मालेगावचे ४२० अशा एकूण एक हजार ९१९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of active patients in Nashik district has increased by 306 nashik marathi news