दिलासादायक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा दुपटीने रुग्णांची कोरोनावर मात

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

ग्रामीण भागातून त्र्यंबकेश्र्वरच्‍या तेली गल्‍लीतील ७८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये नाशिक ग्रामीणचे दोन हजार २८, नाशिक शहरातील पाच हजार ७९५, मालेगावचे एक हजार ८२, जिल्‍हाबाह्य १३० रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक : गेल्‍या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांचा वाढता आकडा जिल्‍हावासीयांना चिंतेत टाकणारा होत चालला होता; परंतु रविवारी (ता. २६) काहीशी दिलासादायक बाब आढळून आली. सायंकाळी साडेपर्यंतच्‍या आकडेवारीनुसार दिवसभरात ४३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

जिल्‍हाभरात ४३४ मुक्त, तर २१९ नवीन बाधित 

शहरातील दोन व ग्रामीण भागातील एक अशा तीन रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार १६२ कोरोनाबाधित आढळले असून, नऊ हजार ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी (ता. २६) दिवसभरात आढळलेल्‍या २१९ कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १४२, नाशिक ग्रामीणचे ६६, मालेगावचे १०, तर जिल्‍हाबाह्य एक अशा एकूण २१९ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या ४३४ जणांमध्ये नाशिक शहरातील ३५२, नाशिक ग्रामीणचे ७८, मालेगावचे तीन, तर जिल्‍हाबाह्य एका रुग्णाचा समावेश आहे. 

मृतांचा आकडा ४५७ वर

तीन मृतांमध्ये सिडकोतील नेहरू चौकातील ५० वर्षीय महिला, दत्त चौकातील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ग्रामीण भागातून त्र्यंबकेश्र्वरच्‍या तेली गल्‍लीतील ७८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये नाशिक ग्रामीणचे दोन हजार २८, नाशिक शहरातील पाच हजार ७९५, मालेगावचे एक हजार ८२, जिल्‍हाबाह्य १३० रुग्णांचा समावेश आहे. सध्या दोन हजार ६७० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा ४५७ वर पोचला आहे. 

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

दिवसभरात ८२५ संशयित दाखल
 
विविध मोहिमा व आरोग्‍य यंत्रणेच्‍या प्रयत्‍नांतून संशयितांना उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे. रविवारी दिवसभरात ८२५ संशयित आढळले. यांपैकी ६५१ नाशिक शहरातील असून, ७९ नाशिक ग्रामीण, दहा मालेगाव, तर ८५ गृहविलगीकरणातील आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ८११ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

(संपादन - किशोरी वाघ)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona-free patients in the nashik district is double that of corona patients nashik marathi news