Coronavirus Lockdown_4.jpg
Coronavirus Lockdown_4.jpg

Coronaupdates : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 900 पार; मुंबई कनेक्‍शनही ठरतेय घातक

Published on

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 22) दिवसभरात मालेगाव येथील दोन आणि नाशिक शहरातील 11 असे एकूण 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 903 झाली असून, मुंबई कनेक्‍शनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात तब्बल 107 रुग्ण वाढले आहेत. 

203 बाधित रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक शहरातील रुग्णांमध्ये 7 ते 13 वयोगटातील चौघांचा समावेश असून, यात तीन मुली आहेत. बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषत: मालेगावपाठोपाठ आता रुग्णांचे मुंबई कनेक्‍शन घातक ठरत असून, जिल्हावासीयांसाठी हा चिंतेचा विषय ठरतोय. दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 903 झाली असून, त्यातील 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये 203 बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, यात मालेगावातील 140 रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे तारीखनिहाय टप्पे 

* 27 मार्च : पहिला रुग्ण 
* 21 एप्रिल : 100 
* 28 एप्रिल : 200 
* 2 मे : 300 
* 5 मे : 400 
* 6 मे : 500 
* 9 मे : 600 
* 12 मे : 700 
* 18 मे : 800 
* 22 मे : 900 

एकूण कोरोनाबाधित : 903 

* मालेगाव : 686 
* नाशिक : 67 
* उर्वरित जिल्हा : 111 
* अन्य जिल्ह्यांतील : 39 
* जिल्ह्यात एकूण मृत्यू : 46 
* कोरोनामुक्त : 654  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com