जिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींची संख्या हजाराच्‍या उंबरठ्यावर; ९० टक्‍के बळी ४१ वर्षापुढील 

अरुण मलाणी 
Tuesday, 8 September 2020

जिल्‍ह्‍यातील पहिला बळी मालेगावचा गेल्‍यानंतर प्रारंभीचे काही मृत्‍यू मालेगावमधीलच राहिले. परंतु नाशिक शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जातांना मृत्‍यूंच्‍या आकड्यातही वाढ होत गेली.

नाशिक : जिल्‍ह्‍यात बाधितांची संख्या वाढण्यासोबत कोरोनामुळे बळींचा आकडादेखील वाढत असून, मृत्‍यूचा आकडा एक हजाराच्‍या उंबरठ्यावर पोहोचला आहे. काल (ता.७) एकूण ९५७ मृत्‍यूंमध्ये नाशिक जिल्‍ह्‍यातील ९२९ मृत्‍यू असून, २४ रूग्‍ण जिल्हाबाह्य आहेत. जिल्‍ह्‍यातील मृतांमध्ये तब्‍बल नव्वद टक्‍के रूग्‍ण ४१ वर्षापुढील आहेत. वीस वर्षाआतील केवळ दोन रूग्‍ण दगावले आहेत.

बरे होणारऱ्या रूग्‍णांचे प्रमाण लक्षणीय

मृतांमध्ये पुरूषांचे प्रमाण ५५ टक्‍के असून, ४५ टक्‍के महिला आहेत. 
कोरोना बाधितांचा जिल्‍ह्‍यातील आकडा ४० हजार पार गेला असून, सरासरी एक हजार रूग्‍णांची रोज भर पडत आहे. समाधानाची बाब म्‍हणजे बरे होणारऱ्या रूग्‍णांचेही प्रमाण लक्षणीय असून, सद्य स्‍थितीत सुमारे साडे सात हजारहून अधिक बाधितांवर उपचार सुरू आहेत. असे असले तरी जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंचा आकडा एक हजारांच्‍या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

या रुग्णांच्या मृत्‍यूंची संख्या सर्वाधिक

जिल्‍ह्‍यातील पहिला बळी मालेगावचा गेल्‍यानंतर प्रारंभीचे काही मृत्‍यू मालेगावमधीलच राहिले. परंतु नाशिक शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जातांना मृत्‍यूंच्‍या आकड्यातही वाढ होत गेली. चाळीव वर्षाआतील रूग्‍णांच्‍या मृत्‍यूचे प्रमाण तुलनेने कमी बघायला मिळत आहे. ६१ वर्षापुढील रूग्‍णांच्‍या मृत्‍यूंची संख्या सर्वाधिक राहिली आहे. त्‍यापाठोपाठ ४१ ते ६० वर्षे वयोगटातील रूग्‍णांचा कोरोनामुळे बळी गेले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

५८ टक्‍के बळी नाशिक शहरातले

काल (ता.७) च्‍या आकडेवारीनुसार नाशिक महापालिका हद्दीत ५३८, नाशिक ग्रामीण २७५, तर मालेगाव महापालिका हद्दीतील मृतांची संख्या ११६ आहे. यात ५८ टक्‍के मृत्‍यू शहरातील, साडे बारा टक्‍के मृत्‍यू मालेगाव महापालिका हद्दीतील तर २९.६० टक्‍के मृत्‍यू नाशिक ग्रामीण भागातील अर्थात अन्‍य तालुक्‍यांतील आहेत. जिल्हाबाह्य मृत रूग्‍णांची संख्या २४ इतकी आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण मृतांचा आकडा ९५३ वर पोहोचला आहे. 

असे आहे मृत्‍यूंचे वयोगटनिहाय प्रमाण 
वयोगट   शहर  नाशिक ग्रामीण   मालेगाव 

पुरूष महिला पुरूष महिला पुरूष महिला 
० ते २० वर्षे  - ०, १,   ०, ०   १, ० 
२१ ते ४० वर्षे  - ४२, १५  २०, ३  ३ , ७ 
४१ ते ६० वर्षे  - १५०, ५९  ७०, ३९  ४०, २६ 
६१ वर्षापुढील - १९४, ७७  ९३, ५०  २८, ११ 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of Corona victims is close to a thousand nashik marathi news