Nashik Corona Update : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजारांवर...तर मृतांचा आकडा पाचशेपार

corona test 1_1.jpg
corona test 1_1.jpg

नाशिक : जिल्ह्या‍त कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णांचा आकडा पाचशेहून अधिक झाला आहे. शनिवारी (ता. १) शहरातील पाच कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाला असून, आतापर्यंत ५०५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात ५९८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, आतापर्यंत आढळलेल्‍या बाधितांची संख्या १५ हजार ५७ झाली आहे. तसेच २१७ रुग्‍ण
दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ११ हजार ३४४ झाली आहे. 

मृतांचा आकडा पाचशेपार

शनिवारी (ता. १) आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ३५४, नाशिक ग्रामीणचे १७८, मालेगावच्‍या २८ रुग्‍णांचा समावेश आहे. तर बरे झालेल्‍या २१७ रुग्‍णांमध्ये १४२ नाशिक शहरातील असून, ७३ नाशिक ग्रामीण व मालेगावच्‍या दोघांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरातील सर्व सहा मृत नाशिक शहरातील होते. पंचवटी नाग चौकातील ५५ वर्षीय पुरुष,
गंगापूर रोडवरील ७७ वर्षीय महिला, पंडितनगर येथील ५० वर्षीय महिला, अशोकनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, आगार टाकळी रोडवरील ६९ वर्षीय पुरुष, केवल पार्क रोड येथील ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला आहे. 

जिल्‍हाबाह्य १३७ रुग्‍णांनी कोरोनावर मात

दिवसभरात ९०५ संशयित आढळून आले असून, यातील नाशिक शहरातील ७६० रुग्‍णांचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीणचे ११८ रुग्‍ण असून,
मालेगावचे २२ रुग्‍ण आहेत. गृह विलगीकरणात पाच रुग्‍णांना ठेवले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ९९३ अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान, नाशिक शहरातील सात हजार ४४९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर नाशिक ग्रामीणच्‍या दोन हजार ६२७, मालेगाव महापालिका हद्दीतील एक हजार १३१, जिल्‍हाबाह्य १३७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, रात्री
उशिरा आणखी ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

मालेगावात ३५ पॉझिटिव्ह, 
दोन संशयितांचा मृत्यू 

मालेगाव : शहरात तब्बल एक महिन्यानंतर प्रथमच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहर व परिसरातील १४८ अहवालांपैकी ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सहारा हॉस्पिटलच्या कोविड केअर केंद्रात उपचार सुरू असलेल्या दोघा संशयितांचा मृत्यू झाला. दिवसभरात नव्याने १९ रुग्ण दाखल झाले. चौघांना उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याने घरी सोडून देण्यात आले. एका रुग्णाला अन्यत्र हलविण्यात आले. सध्या ९० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नांदगाव येथील चार, मनमाड येथील एक रुग्ण वगळता उर्वरित शहरातील विविध भागातील आहेत. 

लखमापूरचा बाधिताचे धुळे कनेक्शन 

लखमापूर (ता. बागलाण) : येथे चार बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर शनिवारी (ता. १) पुन्हा २६ वर्षीय व्यावसायिक युवक कोरोनाबाधित आढळला. मागील चार कोरोनाबाधितांचे धुळे कनेक्शन, तर पुन्हा नवीन पॉझिटिव्ह आलेला रुग्णही धुळे जाण्यामुळेच बाधित झाला असल्याचा संशय आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात
आले आहे.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com