चिंताजनक! जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह पाचशे पार..आकडा 507

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 7 May 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने मालेगावात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी चिंताजनक होत आहे. मंगळवारी (ता. 5) मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 470 झाले होते. बुधवारी दिवसभरात नव्याने 33 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात मालेगाव आणि दाभाडीत नव्याने 33 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले. गुरूवारी (ता.७) जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 507 झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात 26 दिवसांत शंभर कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर पुढचे 400 रुग्ण मात्र अवघ्या 16 दिवसांत आढळून आल्याने जिल्ह्याचा आकडा बुधवार (ता. 6)अखेर पाचशेच्या वर गेला आहे. बुधवारी दिवसभरात 33 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, मालेगावात बुधवारी पुन्हा एका संशयिताचा मृत्यू झाला. 

गुरुवारी(ता.७)  जिल्ह्यात आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण. 
- नाशिकच्या - टाकळी रोडला समता नगरमध्ये एक
- येवल्यात 2
- सिन्नरमध्ये 1 
जिल्ह्यात - 507

33 नवीन कोरोनाचे रुग्ण; मालेगावात संशयिताचा मृत्यू ​
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने मालेगावात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी चिंताजनक होत आहे. मंगळवारी (ता. 5) मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 470 झाले होते. बुधवारी दिवसभरात नव्याने 33 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 503 झाला आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात मालेगाव आणि दाभाडीत नव्याने 33 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले. गुरूवारी (ता.७) जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 507 झाला आहे.

48  रिपोर्ट निगेटिव्ह, 17 जणांचा मृत्यू
दरम्यान, जिल्ह्यातील 805 कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीणचे 64, नाशिक महापालिकेचे 38, मालेगावचे 697 आणि परजिल्ह्यातील सहा असे 805 रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. प्रलंबित रिपोर्ट वेळेत मिळत नसल्याने संशयित रुग्ण व त्यांचे आप्तस्वकीय चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात आजअखेर तीन हजार 48 कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा तारखेनिहाय टप्पा 
- 27 मार्च : पहिला रुग्ण 
-16 एप्रिल : 50 
- 21 एप्रिल : 100 
- 28 एप्रिल : 200 
- 2 मे : 300 
- 5 मे : 400 
- 6 मे : 500 

हेही वाचा > अचानक आगीच्या ज्वाला आकाशात उठल्या...सगळ्यांचाच उडाला थरकाप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona victims in the nashik district has crossed five hundred nashik marathi news