CoronaUpdate : नाशिक शहरातील रूग्णसंख्या साठ हजारांवर; कोरोनाचा डबलिंग रेट ४५ दिवसांचा

अरुण मलाणी
Wednesday, 21 October 2020

ऑक्‍टोबर महिन्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट जाणवते आहे. याचा परिणाम रूग्‍ण दुप्पट होण्याच्‍या प्रमाणावर झालेला आहे. यापूर्वी सोळा ते अठरा दिवसांवर असलेला हा दर आता ४५ दिवसांवर पोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नव्वद हजारांवर पोचली असताना, यापैकी साठ हजार ०७३ रूग्ण हे नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. यापैकी ५६ हजार ०४४ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ३ हजार १९३ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८४६ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, गेल्‍या ६ सप्‍टेंबरला शहरातील बाधितांची संख्या तीस हजार होती. त्यामुळे, रूग्‍ण दुप्पट होण्याचा दर (डबलिंग रेट) ४५ दिवसांचा झालेला आहे. 

रूग्‍ण दुप्पट होण्याचा दर ४५ दिवसांवर

ऑक्‍टोबर महिन्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट जाणवते आहे. याचा परिणाम रूग्‍ण दुप्पट होण्याच्‍या प्रमाणावर झालेला आहे. यापूर्वी सोळा ते अठरा दिवसांवर असलेला हा दर आता ४५ दिवसांवर पोचला आहे. बुधवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २२४, नाशिक ग्रामीणचे २५६, मालेगावचे १५ तर, जिल्‍हाबाह्य सात रूग्ण आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील २२२, नाशिक ग्रामीणचे ३२१, मालेगावचे २२ तर, जिल्‍हाबाह्य सहा रूग्चा समावेश आहे. तर, दिवसभरातील अकरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील चार आणि नाशिक ग्रामीणमधील सात रूग्‍ण आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

बळींची संख्या १ हजार ६२४ वर

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ९० हजार ५७२ झाली असून, यापैकी ८२ हजार ५०८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या १ हजार ६२४ वर पोचली आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५४४, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १०९, मालेगावला सात, डॉ. वसंत पवार रूग्‍णालयात नऊ रूग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत ९०७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ५६४ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांचे आहेत. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

अशी वाढली रूग्णसंख्या (महत्वाचे टप्पे) 
१७ जुलै----------- ५००० 
२ ऑगस्‍ट--------- १०००० 
२३ ऑगस्‍ट-------- २०००० 
६ सप्‍टेंबर--------- ३०००० 
१७ सप्‍टेंबर-------- ४०००० 
२८ सप्‍टेंबर-------- ५०००० 
२१ ऑक्‍टोबर------ ६० हजाराहून अधिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of patients in Nashik city is over sixty thousand marathi news