
सिन्नर (नाशिक) : मागील काही महिन्यांपासून शिर्डीसह परिसरातील काही नगरपंचायतीच्या हद्दीत फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना सिन्नरच्या पूर्वेकडील गावांमध्ये आणून सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्र्यांना आणून सोडण्याचे प्रकार वाढले
मोठ्या शहरांमध्ये अथवा उपनगरांमध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करायची आणि कार्यक्षेत्राबाहेर दूर अंतरावर नेऊन सोडण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. शिर्डीत कुत्र्यांना पकडून त्यांना सिन्नरच्या पूर्व भागातील गावांमध्ये आणून सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी वाहनांमध्ये या कुत्र्यांना आणून सोडले जाते. परिणामी वावी, पाथरे सायाळे, मिरगाव माळढोण ते जवळके परिसरात झुंडीने फिरणारे कुत्रे अनेकदा नजरेस पडतात. डझनाच्या आसपास एकत्र फिरणाऱ्या या कुत्र्यांची परिसरात दहशत निर्माण झाली आहे. धष्टपुष्ट आणि निरोगी प्रकारातील हे कुत्रे बघताक्षणी अंगावर अंगावर तुटून पडतील अशी परिस्थिती असते. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दहशतीचा सामना करावा लागतो आहे. सिन्नर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांनी मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. तसेच संबंधित नगरपंचायतींना ताकीद द्यावी अशी मागणी पूर्व भागातील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.
पोल्ट्रीच्या मृत कोंबड्यांवर ताव
निर्जन स्थळी आणून ठेवण्यात आलेले कुत्रे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे मार्गक्रमण करतात. सिन्नरच्या पुर्वभागात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तिथे मृत होणारे पक्षी शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या लगत फेकले जातात. याच मृत कोंबड्या या कुत्र्यांचे हक्काचे अन्न ठरले आहे. त्यामुळे कळपच्या कळप अशा भागात भटकत असतात. एखादे वेळेस अन्न मिळाले नाही तर हे कुत्रे जाणाऱ्या येणाऱ्याच्या अंगावर धावतात.
बंदोबस्त करणे आवश्यक
वावी गावात कुत्र्यांच्या दोन-तीन टोळ्या फिरत आहेत. हे सर्व नर कुत्रे असून त्यांची दहशत लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांमध्ये आहे. रात्रीच्या वेळी ही कुत्री आणून सोडली जात असली तरी ती शिर्डी परिसरातूनच आणली जातात. अनेकांनी ही वाहने बघितली आहेत परंतु कोणी बोलायच्या आत ही वाहने पसार होतात. स्थानिक यंत्रनांनी याकडे लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. - विलास पठाडे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ वावी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.