
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेची दीड वर्षांची मुलगी पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलेची दीड वर्षांची मुलगी पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आजपासून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत आणि आज (दि.१३) त्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी रुग्णालयातून दीड वर्षाची प्रगती भोला गौड ( वय दीड वर्ष) ठाणे ही मुलगी पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रतिभा गौड ही महिला तिच्या बहिणीच्या बहिणीच्या मदतीसाठी शासकिय रुग्णालयात आली होती. दरम्यान प्रसूती कक्षा बाहेर दुपारी अज्ञात व्यक्तीने कक्षा बाहेर झोपवलेले बाळ पळवून नेले. मुलीला नेताना संशयिताचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह
नेमके काय घडले?
अपह्रत मुलीला घेऊन तिची आई व मावशी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलीला झोप लागल्याने आईने तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले. आई पुन्हा कक्षात गेली. दुपारी दोनच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. रुग्णालयातील सिसिटीव्ही तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून जाताना आढळला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी