धक्कादायक! बाचाबाचीतून पत्नी-मुलं धावले युवकावर; बेदम मारहाणीत युवकाचा नाहक बळी

अंबादास शिंदे
Thursday, 29 October 2020

रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवरून घराकडे जात  शिंगार यांनी ढाले यांच्याशी बाचाबाची झाली. शिंगार यांनी फोन करून मुले व पत्नीस घटनास्थळी बोलावून घेतले. आणि मग असा प्रकार घडला की ज्याची कल्पना त्या कुटुंबालाही नसावी. काय घडले वाचा

नाशिक रोड : रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवरून घराकडे जात  शिंगार यांनी ढाले यांच्याशी बाचाबाची झाली. शिंगार यांनी फोन करून मुले व पत्नीस घटनास्थळी बोलावून घेतले. आणि मग असा प्रकार घडला की ज्याची कल्पना त्या कुटुंबालाही नसावी. काय घडले वाचा

काय घडले नेमके?

राहुल जमधडे (रा. संभाजीनगर, एकलहरे रोड) यांच्या तक्रारीनुसार, बाळासाहेब शिंगार (वय ४७, रा. संभाजीनगर), प्रकाश ढाले (सामनगाव) पेंटिंगचे काम करतात. ते रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवरून घराकडे जात असताना रेल्वे ट्रॅक्शन गेटजवळ शिंगार यांनी ढाले यांच्याशी बाचाबाची झाली. शिंगार यांनी फोन करून मुले व पत्नीस घटनास्थळी बोलावून घेतले. मुलगा सागर शिंगार, पत्नी अनिता शिंगार व एक अल्पवयीन मुलगा घटनास्थळावर बेस बॉलचे दांडके घेऊन आले. ढाले यांना मारहाण करण्यास सुरवात केली. सागर शिंगार (वय २०) याने बेसबॉलच्या दांड्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. वर्मी घाव बसल्याने ढाले जागीच कोसळले. तरीही सागरने दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

दांपत्यासह एका मुलावर गुन्हा दाखल

एकलहरे रस्त्यावरील रेल्वे कर्षण मशिन काराखाना परिसरात संभाजीनगर येथे वादातून एका तरुणाचा कुटुंबातील चौघांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी दांपत्यासह एका मुलावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक झाली. याप्रकरणी बाळासाहेब शिंगार, अल्पवयीन मुलगा, सागर शिंगार व अनिता शिंगार यांना आरोपी केले असून, अनिता व सागर यास पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी पाहणी केली.  

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in family beating nashik road marathi news