पावसाच्या सावटात द्राक्षबागा आणि शेतीकामांची धांदल; हंगामात लाखभर मजुराच्या हाताला काम 

grape crop nashik district
grape crop nashik district

नाशिक/निफाड : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पूर्ण हंगामभर कोसळलेला पाऊस या परिस्थितीशी दोन हात करत निफाड तालुक्यातील शेतकरी आहे ती हंगामातील पिके वाचवीत आहे. यामुळे बळीराजाची शेती कामांसाठी धांदल उडाली असून द्राक्षबागांसह मका, सोयाबीन खरिपाच्या पिकांच्या सोंगणीसाठी आलेल्या लाखो मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. 

मोठ्या संख्येने मजूर तालुक्यात दाखल

चालू वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवात पासून पाऊस कोसळत राहिला. सततचा कोसळणाऱ्या पावसाने शेतात उभी असलेली पिके सडली तर ऊस आडवा झाला, टाकलेले कांदा बियाणे वाया गेले. भाजीपाल्याच्या पिकांची वाताहत झाली. तर द्राक्ष बागाचा उशिराच्या छाटण्यांमुळे हंगाम लांबणीवर पडणार आहे. अशा परिस्थितीशी बळी राजा लढा देत असून आहे ती पिके पदरात पाडून घेण्यासाठी सर्वतोपरी धावपळ करत आहे. दरम्यान निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीकामांसाठी गुजरातेतील अहवा, डांग, तसेच पेठ सुरगाणा, हरसुलसह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात मजूर तालुक्यात दाखल झाले असून आलेल्या या मजुरांसह स्थानिक मजुरांच्या हातांना काम मात्र मिळाले आहे. तर दुसरीकडे गोदाकाठ परिसरात ऊसतोड हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांचे उऊसतोडणी कामगार डेरे दाखल होत आहे. 

कोरोनाचे संकट असतानाही शेती अन् शेतकऱ्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. सध्या पाऊस असताना देखील निफाड तालुक्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. अशी परिस्थिती असताना देखील अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. 
- योगेश रायते, द्राक्ष उत्पादक खडकमाळेगाव 

पीक मजुरी दर (एकर) 
मका ५००० 
सोयाबीन ४००० 
द्राक्षबाग छाटणी आणि पेस्ट ५००० 
पहिली, दुसरी, तिसरी डिपींग ४००० 
फेलफुट ४००० 
शेंडाबाळी २००० 
इलेक्ट्रोसटटिक ईएसएस १८०० 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com