अशीही माणुसकी..! दोन महिन्यांतच पाहायला मिळाला दातृत्वाचा महापूर...

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 4 June 2020

लॉकडाउन असतानाही भीती, चिंतेमुळे लाखो लोक नाशिकमधून त्यांच्या गावाकडे निघाले. परंतु अशा लोकांमुळे कोरोनाचा "कम्युनिटी स्प्रेड' वाढण्याचीच भीती अधिक असल्याने महापालिकेने अशा लोकांना निवारा केंद्रात सामावून घेत त्यांची तब्बल 45 दिवस सेवा केली, अशा लोकांसाठी दातृत्वाचा महापूर पाहायला मिळाला.

नाशिक : लॉकडाउन असतानाही भीती, चिंतेमुळे लाखो लोक नाशिकमधून त्यांच्या गावाकडे निघाले. परंतु अशा लोकांमुळे कोरोनाचा "कम्युनिटी स्प्रेड' वाढण्याचीच भीती अधिक असल्याने महापालिकेने अशा लोकांना निवारा केंद्रात सामावून घेत त्यांची तब्बल 45 दिवस सेवा केली, अशा लोकांसाठी दातृत्वाचा महापूर पाहायला मिळाला.

दोन महिन्यांत दातृत्वाचा महापूर 
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने 23 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, नेपाळ, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक आदी भागातील परप्रांतीय मजुरांनी घरची वाट धरली. परंतु "कम्युनिटी स्प्रेड' परवडणारा नसल्याने महापालिकेने शहरात 27 हून अधिक निवारा केंद्रे निर्माण केली. 3 एप्रिलपासून निवारा केंद्रात गावाकडे चालत असलेल्या मजुरांना निवारा केंद्रांमध्ये आश्रय देण्यात आला. निवारा केंद्रात निवास, जेवण, मनोरंजन, समुपदेशन आदी सुविधा पुरविण्यात आल्या. त्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्था सरसावल्या. 3 एप्रिलला 57 दानशूर व्यक्ती व संस्था समोर आल्या. तब्बल 150 स्वयंसेवी संस्था नागरिकांनी नऊ लाख 82 हजार 141 नागरिकांना दोन वेळचे पोटभर अन्न व रोजच्या वापराचे साहित्य पुरवून दातृत्वाचा आदर्श घालून दिला. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

45 दिवसांत दहा लाख जणांना 158 स्वयंसेवी संस्थांची मदत 

महापालिकेकडून पास घेऊन जेवणाची सुविधा पुरविली. पहिल्या दिवशी महापालिकेने 158 संस्थांना परवानगी दिली. त्यानंतर ओळखपत्र घेणाऱ्यांची संख्या वाढत केली. सर्वाधिक संख्या 358 पर्यंत पोचली. 17 मेपर्यंत दानशूर व्यक्ती व संस्थांचे प्रमाणे टप्प्याटप्याने घटले. निवारा केंद्राबरोबरच रस्त्यावरील नागरिक व मिळेल, त्या साधनांनी गावाकडे जाणाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. 17 मेपर्यंत नऊ लाख 82 हजार 141 लोकांना जेवण देण्यात आले.  

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One million people in 45 days 158 NGO assistance in lockdown period nashik marathi news