
आईच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या दोन चिमुकल्यांना वडीलांचाच होता आधार. मात्र क्रूरतेची हद्दपार करत जन्मदात्यानेच केला असा प्रकार की संपूर्ण इगतपूरी हादरले. मुलांच्या जखमा बघून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. वाचा नराधम पिताचे धक्कादायक कारस्थान...
इगतपूरी (नाशिक) : आईच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या दोन चिमुकल्यांना वडीलांचाच होता आधार. मात्र क्रूरतेची हद्दपार करत जन्मदात्यानेच केला असा प्रकार की संपूर्ण इगतपूरी हादरले. मुलांच्या जखमा बघून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. वाचा नराधम पिताचे धक्कादायक कारस्थान...
अशी आहे घटना
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राहुल मोरे याच्या पहिल्या पत्नीला 7 वर्षाचा मुलगा (साहील) व 5 वर्षाची मुलगी (प्रिया) आहे. 2016 ला या मुलांच्या आईचा एका दुर्धर आजारात मृत्यु झाला. त्यानंतर राहुल मोरे याने 2017 ला दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला 3 वर्षाची मुलगी आहे. दुसरी पत्नी व स्वत: वडील या दोन लहान मुलांना अमानुषपणे रोज लोखंडी पट्टीने व बेल्टने मारहाण करतात. याबाबत शेजाऱ्यांनी सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजीला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. आजी यांनी स्वत: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.
हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच
पप्पा रोज बेल्टने मारतात...
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलाने सांगितले की, 'पप्पा रोज आम्हाला मारहाण करतात. मम्मी गेल्यानंतर सर्व राग आमच्यावर काढतात. कधी स्केल पट्टीने तर कधी बेल्टाने मारहाण करतात.' मुलांच्या अंगावर, पायावर आणि डोळ्यावर जखमेचे वर्ण दिसून येत आहे. मुलांना झालेली मारहाण पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हळहळले होते. मुलांना झालेली मारहाण पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले होते. मुलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश