बेरोजगारी..आर्थिक चणचण..गृहकलह..कोरोना अन् आत्महत्या; देवदुतांमुळे वाचले १३१ जणांचे प्राण!

रवींद्र पगार
Friday, 14 August 2020

रोजगार नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढीस लागले. कौटुंबिक कलहामध्ये अनेकांनी जीवन संपवण्याच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेक जणांचे जीव गेले देखील...पण...

नाशिक / कळवण : रोजगार नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढीस लागले. कौटुंबिक कलहामध्ये अनेकांनी जीवन संपवण्याच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेक जणांचे जीव गेले देखील...पण...
 

१३१ जणांचे प्राण वाचले
सध्या कोरोनामुळे लॉकडाउन व सर्वत्र जनजीवन ठप्प झाल्याने अनेक कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून, अनेकांचा रोजगार गेला आहे. बाजारपेठ बंद असल्याने व्यापारी, छोट्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. रोजगार नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढीस लागले. कौटुंबिक कलहामध्ये अनेकांनी जीवन संपवण्याच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेक जणांचे जीव गेलेदेखील. 
कळवण तालुक्यासह देवळा, सुरगाणा, बागलाण तालुक्यांत लॉकडाउनदरम्यान चार महिन्यांत १३१ जणांनी विविध कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शर्तींचे प्रयत्न केल्याने या रुग्णांचे आयुष्य वाचले. 

विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले

जगात एकीकडे कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत जीव वाचवण्याची धडपड सुरू असताना दुसरीकडे लॉकडाउन, बेरोजगारी, आर्थिक चणचण, गृहकलह, नैराश्यासह विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र असून, कळवण उपजिल्हा रुग्णालयात चार महिन्यांत १३१ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्यांच्यावर उपचार झाल्याने या सर्वांचा जीव वाचला. 

चार महिन्यांतील आकडेवारी 
महिना आत्महत्येचा प्रयत्न करणारे 

एप्रिल - १९ 
मे - ३४ 
जून - ३० 
जुलै - ४८ 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

कळवण उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व सर्व सुविधा असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळतात. आत्महत्या प्रकरणातील रुग्ण विशेषतः विष प्राशन केलेले रुग्ण बऱ्याचदा येतात. असे रुग्ण वेळेत दाखल झाले, तर त्यांचा जीव वाचवता येतो. - डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कळवण 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा

आज आपली पिढी कोरोनाच्या संकटातून जात आहे आणि आपल्याला समर्थपणे या संकटावर मात करायची आहे. मानसिक ताणतणाव, नैराश्य, अपयश, भीती अशा विविध कारणांमुळे व्यक्ती एकाकी पडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. मात्र अशा परिस्थितीत आत्मविश्वास व योग्य सल्ला घेतल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. -डॉ. शैलेंद्र गायकवाड, समुपदेशक 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one thirty one people commit suicide due to lockdown nashik marathi news