
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
लासलगाव (जि.नाशिक) : लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांद्याची आवक न आल्याने लिलाव सुरु झाले नाही. आज लासलगांव येथे व्यापारी वर्गाची कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय
गेल्या दोन दिवसांपासून साठवणुकीवर निर्बंध घातले या संदर्भात सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाने माल विक्रीस आणला नाही, जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमिती मध्ये आवके अभावी लिलाव बंद पडले. बाजार समिती च्या सभापती सुुुवर्णा जगताप यांनी पुरेशी आवक आल्यावर लिलाव सुरु करण्यात येतील असे सांगितले.विंचुर बाजार समिती मध्ये 5 नग लिलावासाठी आले होते. ते पण शेतकरी वर्गाने घरी घेऊन जाणे पसंद केले.
हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात
हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;