esakal | 'नाशिकचे ग्रेप पार्क हे देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav-thackeray.jpg

धार्मिक पर्यटनासाठी नाशिक व त्र्यंबकेश्‍वरला येणाऱ्या विविध भागांतील पर्यटकांसाठी ग्रेप पार्क आकर्षण ठरणार आहे. आधीच धरणाच्या समृद्धीने संपन्न असलेल्या या भागातील वायनरी त्याला लागून असलेला ग्रेप पार्क आणि येथील बोट क्लबमुळे या भागातील उपजत पर्यटन अधिक वाढणार आहे.

'नाशिकचे ग्रेप पार्क हे देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पर्यटन वाढीच्या नावाने विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरण नष्ट न करता, आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक व खारघर येथील दोन पर्यटक संकुलांचे रविवारी (ता. 27) मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन ई-लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

बोट दाखविले जाउ नये 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पर्यटन विकास महामंडळाची डेटा पुस्तिका हे एक राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. राज्याला गडकिल्यांचा समृध्द वारसा आहे. त्याची जपवणूक करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक बोट क्लबचा पूर्ण क्षमतेने विकास व्हावा व पर्यटन आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधामुळे नाशिकचे ग्रेप पार्क हे देश - विदेशातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल. त्याची जपण्याचा संकल्प सर्वांनी करणे हेच जागतिक पर्यटन दिनाचे खरे औचित्य ठरेल असे सांगून त्यांनी बोट क्लबकडे कुणाला बोट दाखविता येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. 

पर्यटनासाठी स्वतंत्र पॅकेज करणार

मुंबईतील गिल्बर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर असून या टेकडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे, तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेतील. दोघांचा दगड एक आहे. पण अमेरिकेने या वास्तूची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. आपलेही अशा ठेव्यांची जपणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने पर्यटन विभागाच्या विकासासाठी पहिला निधी रायगडासाठी 600 कोटीच्या रुपात मंजूर केला. त्यातील 20 कोटी निधी वितरीतही केला आहे. गेल्या काही दिवसात या खात्याने चांगले काम केले आहे. पर्यटनाचा विकास करतांना राहण्याची खाण्याची, पोहोचण्याची उत्तम, सोय असायला हवी. यासाठी पर्यटनाचे एक स्वतंत्र पॅकेज करण्याबाबतची सूचनाही यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले...

पुढील काळात नाशिक शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले इगतपुरी येथे हिल स्टेशन विकसित करणे, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा विकास, श्री संत निवृत्ती देवस्थान विकास आराखडा, श्री सप्तशृंगी गड विकास आराखडा, भावली धरण येथील पर्यटन विकास, ओझरखेड धरण येथील पर्यटन विकास, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, येवला तालुक्यातील ममदापूर येथील वन पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येईल, असे सांगून पुढे ते म्हणाले, रायगडाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही कामे तातडीने हाती घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भविष्यात जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात खेचून आणण्यास प्रयत्न करण्यात येतील. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप बनकर, पर्यटन सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, जिल्हाध्कारी सूरज मांढरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण आदी ऑनलाईन होते. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ