'पीएच.डी'ची ऑनलाइन व्हायवा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यातले पहिलेच!

ycmou.jpg
ycmou.jpg

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यात प्रथमच पीएच.डी. शिक्षणक्रमाची ऑनलाइन मौखिक परीक्षा (ऑनलाइन व्हायवा) यशस्वीरीत्या राबविली. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा झाली. ऑनलाइन पद्धतीने पीएच.डी. मौखिक परीक्षा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यात पहिले ठरले आहे. 

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुंबईहून सादरीकरण

राज्य शासनात सचिवपदी कार्यरत अतुल पाटणे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेत सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे ऑनलाइन पीएच.डी. मौखिक परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनात सचिवपदी कार्यरत असलेले श्री. पाटणे यांनी "लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्त्व, महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानात संदर्भात विशेष अभ्यास' या विषयात जवळपास दोन तास पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे 125 स्लाइडच्या सहाय्याने मुंबईहून सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षकांनी व उपस्थित तज्ज्ञांनी, विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारले. विद्यापीठाच्या कॉन्फरन्स रूममध्ये कुलगुरूंसह मानव्यविद्या शाखेचे संचालक प्रा. उमेश राजदेरकर, डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार, डॉ. नागार्जुन वाडेकर व डॉ. प्रकाश बर्वे उपस्थित होते. 

परीक्षक डॉ. शोभा कारेकर पुण्याहून, डॉ. बालाजी कत्तूरवार नांदेडहून सहभागी झाले. ही परीक्षा खुली असल्यामुळे त्यात चंडीगड येथून आयएएस अधिकारी नीलकंठ आव्हाड, मुंबई येथील सहआयुक्त अर्चना कुळकर्णी, अकोल्याहून शिक्षणतज्ज्ञ प्रा. संजय खडक्कर, नागपूर येथून डॉ. संजय इंगोले, मुंबईतून डॉ. नाखले, नांदेडहून डॉ. मोहन आदी सहभागी झाले. आयोजनाची तांत्रिक बाजू कुलसचिव डॉ. भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी व चंद्रकांत पवार यांनी सांभाळली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com