ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा? उच्च पदस्थ पथकाकडून विमानतळाची पाहणी 

विनोद बेदरकर
Wednesday, 7 October 2020

विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्याने देश-विदेशातील विमानांचे ओझर विमानतळावरून टेकऑफ- लँडिंग होणार असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली

नाशिक : ओझर (नाशिक)च्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बुधवारी (ता. ७) विविध विभागांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पथकाने ओझर विमानतळावरील पायाभूत सुविधांची पाहणी केली. 

तर उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना

विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्याने देश-विदेशातील विमानांचे ओझर विमानतळावरून टेकऑफ- लँडिंग होणार असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, यासाठी खासदार गोडसे काही महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. त्याअनुषंगाने ९ सप्टेंबरला दिल्लीत मंत्रालयात बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार खासदार गोडसे यांच्या मागणीनुसार बुधवारी विमानतळाशी संलग्न विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओझर विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

 आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग

आजच्या पाहणी पथकात ब्यूरो ऑफ इमिग्रीनेशनचे जॉइट डायरेक्टर पाठक, हॅलकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर सेन, कस्टमचे चौधरी, एनआयसीचे मते, एच. ए. एल. विभागाचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश होता. ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी गरजेच्या असलेल्या विविध पायाभूत सुविधांबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. संबंधित पायाभूत सुविधांची पूर्तता झाल्यानंतर लवकरच प्रशासकीय मान्यतेनंतर ओझर येथून आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

नाशिकहून आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या आंतरराष्ट्रीय कुरिअर हबला मिळालेल्या मान्यतेमुळे देश-विदेशातून येणाऱ्या पार्सलचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे देखील ये-जा सुरू होणार असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला याचा मोठा फायदा होईल. 
-हेमंत गोडसे, खासदार, नाशिक  

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ozar airport inspection by high-ranking team nashik marathi news