esakal | VIDEO : दीपक शिरसाठसाठी पाकिस्तानचा लंडनहून 'हनी ट्रॅप'; विदेशी नागरिकांशी संवाद टाळण्याचे पोलिस आयुक्तांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Shirsath

नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्वाच्या आस्थापना असून महिनाभरात दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात, दोन्ही जण निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे.

VIDEO : दीपक शिरसाठसाठी पाकिस्तानचा लंडनहून 'हनी ट्रॅप'; विदेशी नागरिकांशी संवाद टाळण्याचे पोलिस आयुक्तांचे आवाहन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : हिंदुस्थान एरोनॅटीक्स लिमीटेड (एचएएल) मधील दीपक शिरसाठ तसेच तोफखाना केंद्रातील मजूर संजीवकुमार या दोघेही सहज पाकिस्तानी कट कारस्थानांना बळी पडले. नाशिकमध्ये कुणाभोवतीही सापळा लावला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी दूरध्वनीबाबत जागरूकपणे वागा, विशेषतः ग्रुप ॲडमिनने काळजी घ्यावी. असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे. 

एजंट तयार करण्याची प्रक्रिया सुरु

नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्वाच्या आस्थापना असून महिनाभरात दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात, दोन्ही जण निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे. शहरातील या दोन्ही घटनांबाबत पोलीस आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवेदन केले. पांडे म्हणाले की, महिनाभरातील नाशिकमधील दोन्ही घटना बघता, पाकिस्तानकडून भारतात माहिती देणारे एजंट तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे हेच पुढे येते आहे. त्यामुळे हनी ट्रॅप मध्ये कुणीही फसू शकतो. सहज उत्सुकता म्हणून विदेशी नागरिकांशी संवाद साधाल तरी फसाल. तुम्ही हनी ट्रॅपमध्ये फसाल याची भनकही लागत नाही इतक्या सहजपणे माणूस जाळ्यात अडकतो. 

लंडनहून ट्रॅप 

दहशतवाद प्रतिबंधक विभागाने अटक केलेला आणि पाकीस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला दीपक शिरसाठ असाच लंडन येथील एका संवादात अडकला. त्यात त्याने २०१९ मध्ये संवेदनशील स्वरुपाची माहिती दिली. एखाद्या मुलीला विमानाविषयी एवढी माहिती असू शकते. या कुतूहलापोटी तो सहज फसत गेला. २०१९ मध्ये संवेदनशील माहीती दिली. कुणाशीही असा संवाद साधला जाऊ शकतो. त्यामुळे कुतुहूल म्हणूनही अनोळखी विदेशी व्यक्तीशी संवाद टाळा. लक्षात येणार नाही इतक्या अलगदपणे लोक फसतात. नकळत पणे महत्वाची संवेदनशील माहीती देउन बसतात तशी वेळ कुणावरही येउ शकते. त्यामुळे नागरिकांनी जागरुकपणे सोशल मिडीयावर संर्पक ठेवावा असे आवाहान केले. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

तोफखान्यातील हेरगिरी 

तोफखाना केंद्राच्या फोटोबाबत हनी ट्रॅप नव्हता. विदेशी तरुणांच्या ग्रुपशी संवाद साधायच्या उत्सुकतेत संजीवकुमार (बिहारी मजूर) फसल्याचे पुढे आले आहे. दरवेळी ट्रॅप हा हनी असेलच असे नाही. तो कसाही असू शकतो. संजीवकुमार यानेही ९२३०३५३४२२८९ या पाकिस्तानी नागरिकांच्या सलमान व इब्राहीम नावाच्या व्हॉटसग्रुपवर फोटो पाठविले. त्याची चौकशी सुरु असून येत्या ३० ऑक्टाबरपर्यत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या बँक खात्याची माहीती घेण्यात आली असून त्यात कुठलीही संशयास्पद माहीती पुढे आलेली नाही. त्यामुळे काळजी घ्यावी. देशाबाहेरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू नका. व्हॉटसग्रुपमध्ये अनोळखी विदेशींना थारा देऊ नका असेही आवाहन केले. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना