"आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 14 July 2020

सोमवार (ता.13) परिसरात गस्त घालीत असताना सुमारे साडे चार वाजेच्या सुमारास उड्डाण पुलावर दोन संशयित एकास मारून पळत असल्याचे निदर्शनास आले. सदर पीडित इसमास विचारणा केली असता झाला खुलासा...

नाशिक / म्हसरूळ : परिसरात गस्त घालीत असताना सुमारे साडे चार वाजेच्या सुमारास उड्डाण पुलावर दोन संशयित एकास मारून पळत असल्याचे निदर्शनास आले. सदर पीडित इसमास विचारणा केली असता झाला खुलासा...

असा घडला प्रकार

पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार,सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस नाईक प्राजोक्त जगताप, महेश साळुंखे,पोलीस शिपाई विलास चारोस्कर, उत्तम खरपडे, नितीन जगताप हे सोमवार (ता.13) रोजी परिसरात गस्त घालीत असताना सुमारे साडे चार वाजेच्या सुमारास उड्डाण पुलावर दोन संशयित एकास मारून पळत असल्याचे निदर्शनास आले.सदर पीडित इसमास विचारणा केली असता पळून गेलेले दोन संशयित हे मारहाण करून तू आम्हाला पैसे दे नाहीतर तुला पुलातून फेकून देऊ असे म्हणत खिशातील पैसे घेऊन पळाले असे सांगितले. हे समजल्यानंतर गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी यांनी पाठलाग करून संशयित उमेश गणेश भुजबळ (रा. रूम न.90,माणिक नगर, सिडको) व राहुल नारायण जाधव (रा.रूम न.551,विडी कामगार नगर, अमृतधाम) यांना ताब्यात घेतले आणि सदर इसमाच्या खिश्यातील काढून घेतलेले पैसे हस्तगत केले.

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.उड्डाण पुलावर एकास मारहाण करीत लूट करणाऱ्या दोन संशयितांना पकडण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchavati Crime Investigation Squad arrested robber nashik marathi news