esakal | रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!
sakal

बोलून बातमी शोधा

cobra kasbe sukene.jpg

सकाळी आठ ते रात्री आठ एक शिक्षक तर रात्री आठ ते सकाळी आठ दोन शिक्षक अशी नियुक्ती तहसीलदारांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. याठिकाणी कोणतीही लाईटची व्यवस्था नसल्याने पर्यायाने रात्रभर शिक्षकांना जीव मुठीत धरून या ठिकाणी सेवा करावी लागते. याशिवाय या ठिकाणी ड्युटी बजावत असताना शेजारी तसेच आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही.

रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / कसबे-सुकेणे : कसबे सुकेणे ता निफाड येथील सावता नगर वस्तीवर तीन कोरोणा रुग्ण आढळल्याने त्या ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आला आहे. त्या चेक पोस्टवरती (ता.१२) रात्री ड्युटी करत असताना धनंजय किसन मोरे या शिक्षकांना चक्क चेक पोस्ट वरती सहा फूट जाडजूड कोब्रा जातीचा विषारी नाग दिसून आल्याने त्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.

मुठीत जीव घेऊन बारा तासांची शिक्षकांची ड्युटी

याठिकाणी शिक्षकांना कोरोणा चेक पोस्ट वरती ड्युटी करत असताना कोणत्याही सेवा पुरवण्यात आलेल्या नाही. हा परिसर मुख्य कसबे सुकेणे व कोकणगाव या मुख्य रस्त्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर आहे व एकही वस्ती नसल्याने तसेच जंगलसदृश्य परिसर असल्याने अशा ठिकाणी शिक्षकांना बारा तासांची ड्युटी करावी लागते. सकाळी आठ ते रात्री आठ एक शिक्षक तर रात्री आठ ते सकाळी आठ दोन शिक्षक अशी नियुक्ती तहसीलदारांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. याठिकाणी कोणतीही लाईटची व्यवस्था नसल्याने पर्यायाने रात्रभर शिक्षकांना जीव मुठीत धरून या ठिकाणी सेवा करावी लागते. याशिवाय या ठिकाणी ड्युटी बजावत असताना शेजारी तसेच आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही.

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

शिक्षकांना अंधारातच काढावी लागते रात्र​

त्याच ठिकाणी पावसापासून आधार घेत असताना याठिकाणी मोरे या शिक्षकांना हा कोब्रा आढळून आला होता पावसाळ्याचे दिवस असल्याने शिक्षकांना पावसापासून निवारा मिळावा यासाठी जागा देखील उपलब्ध नाही अशा कठीण प्रसंगी शिक्षक कोरोना ड्युटी बजावत असून त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे याठिकाणी जे तीन कोरोना रुग्ण आढळले होते त्यापैकी 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून बाकी दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. त्यामुळे या परिसरातील शिक्षकांच्या सेवा रद्द करण्यात यावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

शिक्षकांना संरक्षण द्यावे

मी रविवारी रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंतचे चेक पोस्ट वरती कोरोना ड्युटी केली आहे भयानक स्वरूपाचा अंधार असून कोणीही या ठिकाणी रात्रीच्या वेळी येत नाही त्यामुळे रात्रीची ड्युटी रद्द करावी व शिक्षकांना संरक्षण द्यावे -  वसंत भरसठ, उपशिक्षक, मौजे सुकेने विद्यालय 

go to top