मर्डर मिस्ट्री! 'तो' नोकरीच्या शोधात घरातून गेला, पण परतलाच नाही...नेमके काय घडले?

रोशन खैरनार
रविवार, 2 ऑगस्ट 2020

त्याची विचारपूस केली असता राकेशने उडवाउडवीचे उत्तर दिले. सहा दिवसांनी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोप आला होता. हा सर्व बनाव असून तेजसचा राकेशने घातपात केल्याचा आरोप युवकाच्या आईवडिलांनी केला आहे. 

नाशिक/सटाणा : जुने निरपूर (ता.बागलाण) येथील मूळ रहिवासी तेजस संजय सूर्यवंशी (वय २३) हा युवक गेल्या वर्षभरापासून भरतीपूर्व पोलीस दलाचे प्रशिक्षण घेत होता. नोकरीच्या शोधात गेला, तो घरी परतलाच नाही...कुटुंबियांना मात्र वेगळाच संशय...वाचा काय आहे प्रकार

घातपात केल्याचा आरोप

निवेदनात, भंडारपाडा (ता.बागलाण) येथील रोहित सीताराम घोडे याच्यावर संशय असल्याचे नमूद केले आहे. जुने निरपूर येथील संगीता व संजय महादू सूर्यवंशी हे चौगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करतात. त्यांचा मोठा मुलगा तेजस गेल्या वर्षभरापासून भरतीपूर्व पोलीस दलाचे प्रशिक्षण घेत होता. १३ जुलैला त्याचा मित्र रोहित घोडे याने त्याला नोकरीचे आमिष
दाखवून नाशिकला नेल्याची तक्रार निवेदनात केली आहे. त्याची विचारपूस केली असता राकेशने उडवाउडवीचे उत्तर दिले. सहा दिवसांनी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोप आला होता. हा सर्व बनाव असून तेजसचा राकेशने घातपात केल्याचा आरोप युवकाच्या आईवडिलांनी केला आहे. 

मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा 

याबाबत कळवण पोलिसांशी संपर्क साधला असता तेजस सूर्यवंशीचा मारहाणीत मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे. १९ जुलैला चार जणांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. यावेळी कामगारांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्याच्यात तेजस सापडल्याने कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ कळवणच्या
शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

तेजसच्या संशयास्पद मृत्यूची तत्काळ सखोल चौकशी करावी आणि दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत युवकाच्या पालकांनी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या गुन्ह्यात अन्य एकाला अटक केली असून दोन जण फरार आहेत. तेजसचा मारहाणीत मृत्यू झाला असून त्याचा तपास शीघ्रगतीने सुरू आहे. लवकरच त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना गजाआड केले जाईल, असे कळवण पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents allege suspicious death of youth; Demand to file a case nashik marathi news