नाशिकमधील 'हे' परिसर सलग दोनदा प्रतिबंधित...जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 May 2020

नाशिकमधील हे परिसर सलग दोनदा प्रतिबंधित जाहीर झाले असून, महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. 

नाशिक : महापालिका हद्दीत सिडकोतील पाटीलनगर येथील एक ट्रॅक्‍सी ड्रायव्हर, तर आनंदवली येथील नवश्‍या गणपती परिसरात महिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दोन्ही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. नवश्‍या गणपती परिसर सलग दोनदा प्रतिबंधित जाहीर झाला असून, महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. 

मुंबई कनेक्शनची शक्यता
नाशिकमध्ये कोरोनाचे शहरात दहा रुग्ण होते. मे महिन्यात 12 दिवसांत कोरोना रुग्ण चारपटीने वाढले आहेत. गुरुवारी (ता. 14) दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सिडकोतील पाटीलनगरमधील एका टॅक्‍सी ड्रायव्हरचा समावेश आहे. सर्दी, ताप व खोकल्याच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. संबंधित ड्रायव्हर घोटी, इगतपुरी असा टॅक्‍सी चालवायचा. त्यामुळे ट्रॅव्हल्स हिस्ट्रीवरून मुंबई कनेक्‍शन असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 

प्रसूतीपूर्वी महिलेच्या घशाचा स्राव

नवश्‍या गणपती परिसरातील एका महिलेला प्रसूतीसाठी गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीपूर्वी महिलेच्या घशाचा स्राव घेण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या या महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातील मुख्य डॉक्‍टरांसह नर्स व अन्य स्टाफला क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक चित्र! माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patilnagar, Navashya Ganpati Premises restricted again in nashik marathi news