मुक्या जीवांचं बोलकं प्रेम! ह्रदयस्पर्शी प्रसंगाने निफाडकर भारावले

माणिक देसाई
Monday, 5 October 2020

पण बिचाऱ्या मोराला वेदना होत असल्याने सांगू कोणाला आणि बोलू कोणाला? असे या मोराला झाले होते. त्याचवेळी रस्त्याने जात असताना हा सर्व प्रकार सावळी गावातील संजीव गिरीगोसावी या पक्षीमित्राने बघितले.

नाशिक : (निफाड) सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या सावळीत मोठया संख्येने मोरांचा संचार आहे. सायखेडा-सिन्नर रस्त्यालगत असलेल्या शेतात आपल्या जोडीदारासोबत भ्रमंती करत असतांना दिड महिन्यांपुर्वी झाडांच्या फांद्यात पाय अडकुन मोर अपघातग्रस्त झाला होता. त्याच्या मदतीसाठी लांडोरीने अकांत केला होता. वाचा नेमके काय घडलं?

अखेर दिड महिन्यानंतर झाली भेट

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात मोर आणि लांडोरीची जोडी स्वचंदी मनाने विहार करत असतांनाच अनाहुतपणे मोराचा पाय झुडपात अडकला. मोर स्वतःची सुटका करत असताना मोराचा पाय मांडीमध्ये मोडला. मोराला उडता येईन त्यामुळे मोर जागेवरच पडून होता. त्या मोराबरोबर लांडोर होती. ती मोराच्या भोवती फिरून उडण्याचं मोराला बळ देत होती. पण बिचाऱ्या मोराला वेदना होत असल्याने सांगू कोणाला आणि बोलू कोणाला? असे या मोराला झाले होते. त्याचवेळी रस्त्याने जात असताना हा सर्व प्रकार सावळी गावातील संजीव गिरीगोसावी या पक्षीमित्राने बघितले. जखमी झालेल्या मोराला घरी आणून अन्न, पाणी दिले. वनविभागाला सर्व माहिती देत नाशिक येथे नेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नेत तपासणी केली. मोराची पायाची मांडी मोडल्याने पायाला प्लास्टर केले आहे. निफाड येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. आपल्या अपघातातुन सावरलेल्या जोडीदाराची लांडोर काळजी घेतांना दिसत आहे

मोर आणि लांडोरचा मिलाप घडवुन आणला

वन विभागाचे अधिकारी डॉ सुजित नेवसे, संजय भंडारी आणि सहकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करत मोराला सावळी शिवारातील संजीव गिरी यांच्या मळ्यात नुकतेच  सोडले. मोर आणि लांडोरचा मिलाप घडवुन आणला असता आनंदाने आपल्या जोडीदाराची लांडोरीने भेट घेत आवाज केला. दरम्यान परतुन आलेल्या साथीदाराची लांडोर काळजी घेत असुन संजीव गिरी यांचे कुटुंबिय मोर आणि लांडोरीचे दाणापाणी करत सेवाश्रुषा करत आहे.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

गेल्या दिड महिन्यांपासुन आपल्या जोडीदाराच्या विरहात व्याकुळ झालेला लांडुर गिरीयांचे घरावर, अंगणात आवाज देत वाट पहात होता. त्याच्यावर निफाड आणि नाशिक येथे उपचार केल्यानंतर तो बरा झाल्याने त्याच्या आधिवासात सोडले. मोर आणि लांडोरीची भेट घडवुन आणल्याचे आम्हाला निश्चितच समाधान आहे. - संजय भंडारी, वनपरीक्षेत्र अधिकारी

उपचारानंतर जखमी मोराला सावळीतील आमच्या वस्ती परीसरात वन विभागाने सोडले आहे. दिड महिने नित्यनियमाने आपल्या साथीदाराची वाट पहात असलेल्या लांडोराने भावविभोर होत आवाज केला. सध्या मोर आणि लांडोरीची जोडी आमच्या परीसरातच असुन मी आणि माझे कुटुंबिय त्याचे काळजी घेत आहोत. - संजीव गिरी, बेरवाडी

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The peacocks showed true love nashik marathi news