esakal | अब तक 56 हजार..रुग्ण बरे होण्यापेक्षा नवीन रुग्णांची टक्केवारी प्रशासनासाठी डोकेदुखी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona test 123.jpg

पाचही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंतनीय आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा कमी पडू शकतात. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असून, याठिकाणी उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्या लागत आहेत. खासगी हॉस्पिटलची शासन मदत घेत असेल तरीही हे हॉस्पिटल सर्वच रुग्णांना न परवडण्यासारखी आहे म्हणून पुढचा धोका ओळखून शासन समाजमंदिरे, शाळा व महाविद्यालय ताब्यात घेण्याचे काम प्रशासनाने करण्यास सुरवात केली आहे. 

अब तक 56 हजार..रुग्ण बरे होण्यापेक्षा नवीन रुग्णांची टक्केवारी प्रशासनासाठी डोकेदुखी 

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगभर कोरोनाने थैमान घातलेले असतानाच उत्तर महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याची संख्या समाधानकारक असली तरी नवीन रुग्णांमध्ये भर पडत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला आहे म्हणून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून प्रशासनाला आधार द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाची डोकेदुखी

विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाचही जिल्ह्यांमधील 43 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 56 हजार 60 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच 29 हजार 384 रुग्ण सध्या निरीक्षणाखाली आहेत. ही संख्या लक्षात घेता बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची वाढ सध्या प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. 

लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी
उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या जिल्ह्यांपैकी नाशिक 21 हजार 540, नगर पाच हजार 372, धुळे 577, जळगाव 15 हजार 498, नंदुरबार 259 असे 43 हजार 246 रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त रुग्ण वाढतच चालले आहे. नाशिक जिल्ह्यात 23 हजार 616, नगर जिल्हा पाच हजार 742, धुळे जिल्हा सात हजार 140, जळगाव जिल्हा 19 हजार 199 व नंदुरबार जिल्हा 363 असे 56 हजार 60 रुग्ण सध्या पाचही जिल्ह्यांत उपचार घेत आहेत. यावरून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली दिसून येत आहे. विभागाचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असून, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर लागतो. 
लोक घेत नसलेली काळजी, स्थलांतर, मास्क लावून न फिरणे, मादक पदार्थांचे सेवन, अनधिकृत मार्गाने चालविण्यात येणाऱ्या पानटपऱ्या यामधून संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 


समाजमंदिरे, महाविद्यालय ताब्यात घेण्यास सुरवात 
पाचही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंतनीय आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा कमी पडू शकतात. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असून, याठिकाणी उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्या लागत आहेत. खासगी हॉस्पिटलची शासन मदत घेत असेल तरीही हे हॉस्पिटल सर्वच रुग्णांना न परवडण्यासारखी आहे म्हणून पुढचा धोका ओळखून शासन समाजमंदिरे, शाळा व महाविद्यालय ताब्यात घेण्याचे काम प्रशासनाने करण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​


विभागात 29 हजार 384 संशयित निरीक्षणाखाली 
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये संशयित म्हणून 29 हजार 384 जणांना इन्स्टिट्यूट व होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात 13 हजार 354, नगर जिल्ह्यात तीन हजार 118, धुळे जिल्ह्यात दोन हजार 684, जळगाव जिल्ह्यात आठ हजार 92, तर नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार 136 लोकांना क्वारंटाइन करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड