अखेर कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड थांबली; पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराला परवानगी

cremation-hindu.jpg
cremation-hindu.jpg

नाशिक : (जुने नाशिक) कोरोनाबाधितांवर पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची परवानगी अमरधाममधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे मृतदेह अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षेत ठेवण्याच्या समस्येला पूर्णविराम मिळाला आहे. आठवडाभरापासून 'नो वेटिंग'ची स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराला परवानगी

कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली होती. परिणामी, काही दिवसांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर असल्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून वेटिंगवरील मृताच्या अंत्यसंस्करासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नातेवाइकांवर येत. गॅस किंवा विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करावे लागत. एक मृतदेहास सुमारे दोन तास लागत होते. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागत. अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक आणि अमरधाममधील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र गुरुवार (ता.३)पासून पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चितेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारास सुरवात झाल्यापासून आठ दिवसांत सुमारे शंभर ते दीडशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही दाहिनी आणि पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करताना कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, फेस मास्क, हॅन्ड ग्लोज, प्लॅस्टिक ॲप रॉनचा पुरवठा केला जातो. ही सगळी खबरदारी घेऊनच कर्मचारी पुढील विधी करत आहेत. या सर्व वस्तू 'यूज ॲन्ड थ्रो' पद्धतीने वापरले जात असल्याची माहिती देण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com